Home / महाराष्ट्र / Eknath Shinde VS Ravindra Chavan : भाजपाच्या माजी नगरसेवकाने शिंदेंच्या पादाधिकाऱ्यांच्या लगावली कानशिलात? ठाण्यात राजकारणाचा उडाला भडका..

Eknath Shinde VS Ravindra Chavan : भाजपाच्या माजी नगरसेवकाने शिंदेंच्या पादाधिकाऱ्यांच्या लगावली कानशिलात? ठाण्यात राजकारणाचा उडाला भडका..

Eknath Shinde VS Ravindra Chavan : राज्याच्या राजकारणाची सतत बदलणारी दिशा आणि सततचे वाद ह्याने आणि सततचे बदलणारे पक्ष ह्यामुळे...

By: Team Navakal
Eknath Shinde VS Ravindra Chavan
Social + WhatsApp CTA

Eknath Shinde VS Ravindra Chavan : राज्याच्या राजकारणाची सतत बदलणारी दिशा आणि सततचे वाद ह्याने आणि सततचे बदलणारे पक्ष ह्यामुळे राज्याच्या राजकारणाला एक नव वळण मिळालं आहे. एकीकडे राज्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) विरुद्ध उमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असा वाद रंगला असतानाच आणि याच बरोबर नाराजीनाट्य सुरू असतानाच ठाण्यात शिवसेना शिंदे पक्ष आणि भाजप हे आपसात भिडले असल्याची माहिती समोर आली आहे. (Shivsena Shinde vs BJP)

शिवसेना शिंदे पक्षाचे शाखाप्रमुख आणि उपविभाग प्रमुखाला भाजपच्या माजी नगरसेवकाने मारहाण केल्याची बातमी समोर येत आहे. आणि या संधर्भात
नौपाडा पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली आहे.

घडलेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी एनसी देखील दाखल करुन घेतली आहे. काल रात्री उशिरा पोलिसांस सदर प्रकरणाबाबत तक्रार देण्यात आली होती. शिवसेना शिंदे गटाचे हरेश महाडीक, शाखाप्रमुख आणि महेश लहाने, उपविभागप्रमुख यांना मारहाण करण्यात आली होती. भाजपचे माजी आणि जेष्ठ नगरसेवक नारायण पवार (Bjp Narayan Pawar Thane) यांनी हि मारहाण केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीत आधीच पडलेली दरी आता चांगलीच वाढली आहे.

नेमकं प्रकरण काय? (Shivsena Shinde vs BJP Thane)

बीएसयुपी योजनेतील घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देऊन अवघ्या १०० रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयानंतर आता ठाण्यात भाजप आणि शिंदेच्या पक्षात खडाजंगी सुरु झाली आहे. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडक्या बहिणीशी संवाद साधत असल्याची एक चित्रफीत प्रसारित होत आहे. तत्पुर्वी याबाबत मी पाच पत्रे दिली असून राज्य शासन आणि महापालिका प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.

मुद्रांक शुल्काच्या निर्णयानंतर शिंदे गटाने पाचपाखाडी भागातील टेकडी बंगला परिसरात जल्लोष कार्यक्रम करण्याचे ठरवेल. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने या संधर्भात दावा केला आहे की, आम्ही लक्ष्मी-नारायण गृहसंकुलात जल्लोष कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी स्थानिक माजी नगरसेवक नारायण पवार तिकडे आले. त्यांनी ही इमारत मी बांधली आहे असा दावा केला. ते सोबत ४०, ५० जणांना तेथे घेऊन आले होते. ते माजी लोकप्रतिनिधी असूनदेखील त्यांनी माझ्यावर हात उगारला. त्यांनी मला धमक्या दिल्या. हे युती धर्म पाळत नसतील तर युती धर्माचा फायदा काय असे एक कार्यकर्ता म्हणाला. दुसऱ्या एका पदाधिकाऱ्यानेही मला कानशिलात लगाविल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदेंच्या पक्षातील आणि भाजपातील वाढते मतभेदांचा परिणाम या निवडणुकीवर होणार का हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे.


हे देखील वाचा –

Mahayuti Politics : महारष्ट्रातील निवडणूका आणि महायुतीमधील राजकारण

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या