Malegaon Rape and Murder Case : मालेगावमध्ये चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या करण्यात केल्याप्रकरणी नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात आलं असता नागरिकांच्या संतापाचा आज प्रचंड उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी कोर्टात घुसण्याचा जीवतोड प्रयत्न केला. कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणात जमलेल्या लोकांनी पोलिसांना ढकलून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करायला सुरवात केली. आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्याची लोकांची मागणी आहे. त्यासाठी मागील काही दिवसांपासून यासाठी मोर्चे काढले जात आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे १७ नोव्हेंबरला एक भयंकर घटना घडली. एका तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्त्या केली. त्यानंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. याप्रकरणी तीव्र पाडसाद उमटताना दिसत आहेत. या प्रकरणी लोकांकडून तसेच तिच्या पालकांकडून नराधमावर कठोरातील कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे.

दाखल तक्रारीनुसार, तीन वर्षांची चिमुकली काही मुलांसोबत अंगणात खेळत होती. तेव्हा आरोपीने सर्वांना चॉकलेट दिलं. यावेळी त्याने पीडित चिमुकलीला चॉकलेटच आमिष देऊन घरी नेल. मुलगी दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोध घ्यायला सुरवात केली. त्यानंतर गावातच काही अंतरावर असलेल्या एका टॉवरच्या बाजूला चिमुकलीचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता अत्याचार करून खून केल्याचे प्राथमिक तपासात आढळले. पोलिसांनी तत्काळ सूत्रे फिरवली आणि रात्रीतून फरार आरोपी विजय खैरनार याला अटक करण्यात आली. मुलीच्या वडिलांशी झालेल्या वादातून विजयने हे विकृत कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि खून प्रकरणात मालेगाव न्यायालय परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. याआधी न्यायालयाच्या आवारात महिलांनी आपला आक्रोश व्यक्त केला होता तर तरुणांनी ठिय्या आंदोलन देखील केलं होतं. न्यायालय आवराच्या दोन्ही बाजूंना कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा घोषणा मागील चार दिवसांपासून दिल्या जात आहेत.
हे देखील वाचा – Nashik Malegaon Crime News : मालेगावातील मन पिळवटून टाकणारी घटना..









