Bangladesh Earthquake : आज सकाळी मध्य बांगलादेशात ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, ज्यामध्ये किमान सहा जणांचा मृत्यू झाला आणि अधिक जखमी झाले, पश्चिम बंगाल आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के तीव्र स्वरूपात जाणवले.
भूकंपाचे केंद्रबिंदू नरसिंगडी जिल्ह्यातील घोराशाल भागात होते, जे राजधानी ढाक्यापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षणने (USGS) भूगर्भात १० किमी खोली असल्याचे सांगितले.
सुरुवातीच्या पोलिस अहवालात किमान तीन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली होती, परंतु ढाका येथील काही वृत्तांनुसार सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ज्यात इमारतीच्या छताचा आणि भिंतीचा काही भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आणि रेलिंग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला.
भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारती तीव्र हादरल्या. भूकंपानंतरच्या धक्क्यांची भीती असल्याने रहिवासी घरे, कार्यालये आणि उंच इमारतींमधून बाहेर पडले आणि मोकळ्या जागेत जमा झाले.
याच बरोबर कोलकाता, पश्चिम बंगालच्या काही भागात आणि आसामच्या गुवाहाटीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे खबरदारी म्हणून रहिवाशांना मोकल्याजागी आणले गेले. कोलकाताच्या अनेक रहिवाशांनी सोशल मीडियावर तीव्रतेचे वर्णन केले.
हे देखील वाचा –
Margashirsha Guruvar 2025 : मार्गशीर्ष महिन्यात पूजा कशी करावी?









