PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये आजपासून सुरू झालेल्या जी-२० राष्ट्रांच्या शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत.
जी-२० राष्ट्रांची ही विसावी शिखर परिषद असणार आहे. आजपासून २३ नोव्हेंबरपर्यंत ही परिषद चालणार आहे. पंतप्रधान मोदींसह अनेक राष्ट्रांचे प्रमुख या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. तीन सत्रांमध्ये ही परिषद होणार आहे. पहिल्या सत्रात सर्वसमावेशक सातत्यपूर्ण आर्थिक विकास, दुसऱ्या सत्रात जागतिक वाटचालीत जी-२० चे योगदान आणि तिसऱ्या सत्रात सर्वांसाठी समान न्यायाची तरतूद या विषयांवर चर्चा होणार आहे.पंतप्रधान मोदी या तिन्ही सत्रांमध्ये या विषयांवरील भारताचा दृष्टिकोन काय आहे हे प्रभावीपणे मांडणार आहेत.
दौऱ्यावर जाण्याआधी मोदींनी देशवासियांना संदेश दिला.दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सीरील रामफोसा यांच्या निमंत्रणावरून जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मी जात आहे.दक्षिण आफ्रिकेत होणारी जी-२० राष्ट्रांची ही पहिलीच शिखर परिषद असल्याने ती विशेष ठरली आहे,असे मोदी आपल्या संदेशात म्हणाले.
हे देखील वाचा –









