Love Trapped : देशातील वाढती गुन्हेगारी आणि फसवून याला आत कोणतीच सीमा राहिलेली नाही. मिरजेत असाच एक लाजिरवाणा प्रकार घडला आहे. पण हा प्रकार एका तरुण मुलासोबत घडला आहे. या तरुणाला प्रेमाच्या जळत ओढून त्याला लुबाडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह चौघांना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. समाज माध्यमावर मैत्री करून लुबाडण्याचा हा प्रकार असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले आहे. याबाबत कोल्हापूरमधील तरूणांने मिरज शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. मिरजेतील एका तरूणीने फेसबुक या समाज माध्यमातून संबंधित तरुणाशी ओळख केली होती. फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर एकमेकांना संदेश पाठवत, मैत्रीचे प्रेमात रूपांतर करण्याची तयारी या संशयित तरूणीने दर्शवली.
या तरुणीने समाज माध्यमातूनच संदेश पाठवून भेटीसाठी मिरजेत येण्याची विनंती संबंधित तरूणाला केली. हॉटेल, अथवा लॉजवर न येता एका सदनिकेत ये म्हणजे ओळखपत्र वगैरे देण्याचा प्रश्न येणार नाही असेही या तरूणीने या तरूणाला सुचविले. कोल्हापूरहून हा तरूण फेसबुकवर मैत्री झालेल्या तरूणीला भेटण्यासाठी मिरजेत आला. यावेळी तिने त्याला एका फ्लॅटवर बोलवले. हे घर माझेच आहे आणि या ठिकाणी कुणाचीही आडकाठी अथवा व्यत्यय येणार नाही असे सांगत त्याला घरात घेतले. तिच्यासोबत गप्पा मारत असतानाच अचानक तिचे तीन साथीदार त्या ठिकाणी आले आणि माझ्या बहिणीसोबत एकट्यात काय करतोयस असा सवाल करत ते त्या तरुणाच्या अंगावर धावून आले.
त्या तरुणाला चामडी पट्टयाने बेदम मारहाणही केली. तसेच या तरुणाला जबरदस्तीने कपडे काढण्यास भाग पडले. या तरुणाचे अर्धनग्न स्थितीतील छायाचित्रे काढण्यात आली. छायाचित्रे आणि चित्रीकरण समाज माध्यमावर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी देत तक्रारदार तरूणाला चार तास डांबून ठेवण्यात आले. यादरम्यान, त्याच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची साखळी, बोटातील साडेचार ग्रॅम वजनाची अंगठी, १०० ग्रॅम वजनाच्या सोन्याचा मुलामा दिलेल्या चांदीच्या बांगड्या आणि खिशात असलेली २२ हजाराची रोकड असा १ लाख ९७ हजाराचा मुद्देमाल त्याच्याकडून काढून घेण्यात आला.
याच टोळीने कर्नाटकातील चिकोडी येथील एका तरूणालाही अशाच पध्दतीने लुबाडले होते. प्रेमाच्या जाळ्यात ओढून या टोळीने अशीच काही तरूणांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
हे देखील वाचा –









