Vietnam Floods : व्हिएतनाममध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला असून पूर व दरड कोसळण्याच्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
व्हिएतनामच्या ह्यू शहरापासून ते मध्य भागात गेल्या तीन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. व्हिएतनामच्या सर्वच सहाही प्रांतांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे जागोजागी दरडी कोसळल्या आहेत. या पूरामुळे अद्याप ४१ लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. विविध शहरांमध्ये घरात पाणी घुसले आहे. रस्तेही जलमय झाले आहेत.
या पूरपरिस्थितीमुळे बचाव दलाने ६२ हजार लोकांना सुरक्षित स्थानी हलवले आहे. क्वांग न्गाई शहरा पासून ते डाक लाक पर्यंतच्या किनारपट्टीच्या भागातही चक्रीवादळासारखी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सोसाट्याचे वारे आणि पावसामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे येत आहेत. यामध्ये अनेक लहान मोठ्या नद्यांना पूर आले आहेत. प्रशासनाने अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची देखील भिती व्यक्त केली आहे. पावसाचा प्रभाव पुढील दोन ते तीन हा दिवस हा असाच राहणार असल्याचे व्हिएतनामच्या हवामान खात्याने म्हटले आहे.
हे देखील वाचा –









