Home / राजकीय / Rohit Pawar Accuses : साम-दाम-दंड-भेदाने निवडणुका बिनविरोध ; रोहित पवारांचा आरोप

Rohit Pawar Accuses : साम-दाम-दंड-भेदाने निवडणुका बिनविरोध ; रोहित पवारांचा आरोप

Rohit Pawar Accuses – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून (Ruling parties) आपल्या उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी साम, दाम, दंड,...

By: Team Navakal
Rohit Pawar Accuses
Social + WhatsApp CTA

Rohit Pawar Accuses – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून (Ruling parties) आपल्या उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar)यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात त्यांनी एक्स पोस्ट केली आहे.

एक्स पोस्ट रोहित पवार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांची संकल्पना म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण आणि सामान्य माणसाचा निर्णय प्रक्रियेत सहभाग. परंतु आज परिस्थिती अशी आहे की, मंत्र्यांची पत्नी, आई (Mothers), मामेभाऊ किंवा नेत्यांची सून बिनविरोध निवडून येत आहे. या बिनविरोधसाठी साम-दाम-दंड-भेद याचा सर्रास वापर केला जात आहे. सत्ताधारीच स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदे बळकावत असतील तर कोट्यवधी रुपये खर्च करून निवडणुका घेण्याची गरज तरी काय? अशाने हळूहळू लोकशाही (Democracy)संपण्याची भीती वाटते


दरम्यान, अनेक ठिकाणी नगरसेवकपदांसह नगराध्यक्षपदावरही उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत. त्यात चिखलदरा नगरपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis )यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती, जामनेर नगरपालिकेत मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan’) यांच्या पत्नी साधना महाजन, दोंडाईचा नगरपरिषदेत मंत्री जयकुमार रावल (Minister Jaykumar Rawal)यांच्या मातोश्री नयनकुमारी रावल, तर अनगर नगरपंचायतीत भाजपाचे सर्व १७ उमेदवार आणि नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत.या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी हा आरोप केला आहे.


हे देखील वाचा – 

नवले पूल नव्याने उभारणार; मंत्री उदय सामंतांची घोषणा

 मुंबईत दिवसाढवळ्या खुणांचा थरार! कांदिवलीत बिल्डरवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या

कबुतरखाना बंदीविरोधात पुन्हा आंदोलनाचा इशारा

Web Title:
संबंधित बातम्या