Tejas Crashes Pilot Dead : दुबई एअर शोमध्ये शुक्रवारी अत्यतं दुर्दैवी घटना घडली. हवाई प्रदर्शन सुरू असताना भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानाचा भीषण अपघात झाला. आणि काही सेकंदातच तेजस विमान जमिनीवर कोसळले. या विमान अपघातात एक वैमानिक शाहिद देखील झाला. तसेच भारतीय हवाई दलाने आता या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
हवाई दलाच्या एक्सवर पोस्ट या अपघाताची माहिती शेअर करण्यात आली आहे. यात म्हटले, “एअर शोदरम्यान तेजस विमानाचा अपघात झाला. यात एक वैमानिक गंभीर जखमी झाला होता. आणि ज्यात त्याचा मृत्यू झाला. सदर जीवितहानीबद्दल आम्हाला तीव्र दुःख होत आहे. आणि त्यांच्या शोकाकुल कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त करतो. तसेच अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत, असेही हवाई दलाने स्पष्ट केले.
अपघाताच्या शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार दुपारी २ वाजून १० मिनिटांनी विमानाच्या उड्डाणाचे प्रात्यक्षिक दाखवत असताना विमान अचानक कोसळले. उड्डाणानंतर काही सेकेंदातच हे लढाऊ विमान वेगाने खाली कोसळले. त्यामुळे आकाशात आगी आणि काळ्या धुराचे लोट पसरले. एअर शो पाहायला आलेल्या अनेक प्रेक्षकांच्या समोर ही घटना घडली आहे.
या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वैमानिकाचे नाव विंग कमांडर नमांश सियाल असे होते आणि हा वैमानिक केवळ ३० वर्षाचा होता. आणि हे वैमानिक मूळचे हिमाचल प्रदेशचे होते. विंग कमांडर नमांश सियाल यांचे वडील जगन नाथ सियाल हे एअर शोचे व्हिडीओ पाहण्यासाठी युट्यूब पाहत होते. त्यांना अचानकच मुलाच्या या जीवघेण्या अपघाताच्या बातम्या दिसल्या.
नमांश सियाल यांच्या वडिलांची प्रतिक्रिया..
नामांश सीएलचे वडील सांगतात “माझं माझ्या मुलाशी शेवटच काल बोलणं झालं होत. त्याने मला टीव्ही चॅनेलवर किंवा युट्यूबवर वर शोदरम्यान त्याचे सादरिकरण पाहा असे देखील सांगितले होते. आज दुपारी ४ च्या सुमारास, मी युट्यूबवर दुबईमध्ये सुरू असलेल्या एअर शोचे व्हिडिओ स्क्रोल करत होतो. आणि ते करता करता, मला विमान अपघाताच्या बातम्या दिसल्या. तात्काळ मी काय घडलं हे तपासण्यासाठी माझी सून, जी स्वतः एक विंग कमांडर आहे, तिला फोन लावला. काही क्षणांनंतर, किमान सहा हवाई दलाचे अधिकारी आमच्या घरी आले आणि क्षणार्धात माझ्या लक्षात आले की माझ्या मुलाबरोबर काहीतरी वाईट घडले आहे,” असे नमांश सियाल याचे वडील म्हणाले.
सियाल पुढे बोलताना म्हणाले की, “नमांश २००९ मध्ये एनडीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लगेचच संरक्षण दलात सहभागी झाला होता. त्याने आपले शालेय शिक्षण हिमाचल प्रदेशातील प्रायमरी स्कूल डलहौसी, आर्मी पब्लिक स्कूल, YoL कँट धर्मशाला आणि सैनिक स्कूल, सुजानपूर तिरा इथून पूर्ण केले होते. तो अभ्यासात देखील हुशार होता आणि आयुष्याबद्दल त्याची खूप मोठी स्वप्न होती. या दुर्घटनेमुळे आम्ही सगळेच पूर्णपणे खचून गेलो आहोत.”
नमांश यांच्या आई वीणा सियाल या सध्या बोलण्याच्या स्थितीत नाहीत. असे नमांशच्या वडिलांनी सांगितले. “आम्हाला माहिती देण्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांना मी विचारले कि माझ्या मुलाचा मृतदेह कधी परत आणला जाईल. त्यांनी अजून निश्चित वेळ सांगितली नाही, पण प्रक्रियेला दोन दिवस लागू शकतात असे त्यांनी सांगितले” असेही नमांशचे वडील म्हणाले.
हे देखील वाचा –









