Home / महाराष्ट्र / Central Railway Mega Block : ११ दिवसांच्या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत..

Central Railway Mega Block : ११ दिवसांच्या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत..

Central Railway Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वेने बदलापूर आणि पुढील स्थानकादरम्यान उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी...

By: Team Navakal
Central Railway Mega Block
Social + WhatsApp CTA

Central Railway Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वेने बदलापूर आणि पुढील स्थानकादरम्यान उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी मध्य रेल्वेने ११ दिवसांचा मोठा मेघाब्लॉक’ जाहीर केला आहे. आजपासून लागू झालेला हा ब्लॉक ३ डिसेंबरपर्यंत मध्यरात्रीच्या वेळी कर्जत-बदलापूर पट्ट्यात लागू होणार आहे. या ब्लॉकमुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या नोकरदारांसह कर्जत, भिवपुरी, नेरळ, शेलू, वांगणी आणि बदलापूर येथील रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

​रेल्वे प्रशासनाने दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार, वांगणी अप लाईन ते अंबरनाथ आणि अंबरनाथ डाऊन लाईन ते वांगणी दरम्यान दररोज मध्यरात्री २ ते ३:३० वाजेपर्यंत दीड तासाचा मेगाब्लॉक घेतला जाईल. या वेळेत उड्डाणपुलाच्या फाउंडेशनचे काम पूर्ण केले जाणार आहे तसेच ३५० मेट्रिक टनाच्या क्रेनचा वापर करून ३७.२ मीटर लांबीचे दोन स्टील गर्डर बसवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम पूर्ण केले जाणार आहे. पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हि काम अत्यंत आवश्यक आहेत. तरी, यामुळे रात्रीच्या लोकल सेवेवर मात्र थेट परिणाम होणार आहे.

​या ११ दिवसांच्या कालावधीत, मध्यरात्री १२:१२ वाजता सुटणारी CSMT-कर्जत लोकल पूर्णपणे रद्द न करता, ती केवळ अंबरनाथपर्यंतच धावणार आहे. त्यामुळे अंबरनाथ ते कर्जत दरम्यान ही लोकल पुढे जाणार नाही. त्याचप्रमाणे, पहाटे २:३० वाजता कर्जत येथून CSMT साठी सुटणारी लोकल आता कर्जतऐवजी अंबरनाथहून सुटणार आहे. यामुळे रात्रीच्या शिफ्टमधून परतणाऱ्या प्रवाशांची हि एक मोठी अडचण ठरणार आहे. कारण त्यांना अंबरनाथहून पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था स्वतः शोधावी लागणार आहे.

केवळ लोकलच नाही, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकही यामुळे कोलमडणार आहे. भुवनेश्वर-CSMT कोणार्क एक्स्प्रेस आणि विशाखापट्टणम-LTT एक्स्प्रेस या गाड्यांचा मार्ग देखील आता वळवण्यात आला आहे. त्या आता कर्जत-पनवेल-दिवा मार्गे धावतील आणि त्यांना पनवेल तसेच ठाणे स्थानकांवर अतिरिक्त थांबे देखील देण्यात आले आहेत. या ११ दिवसांच्या ब्लॉकमध्ये प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे योग्य ते नियोजन करावे, असे आवाहन देखील मध्य रेल्वेने केले आहे.


हे देखील वाचा – Tejas Crashes Pilot Dead : तेजस विमान अपघातानंतर वैमानिकांच्या वडिलांची भावनिक प्रतिक्रिया..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या