Suicide Case : अमरावती महापालिकेतील अग्निशमन दलातील फायरमन आणि एमआयडीसी केंद्र, बडनेरा येथील केंद्रप्रमुख राजेश वासुदेव मोहन वय वर्ष ५० यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी या संधर्भात जवाब देखील दिला होता. व्हिडिओमध्ये मनपा अग्निशमन दलातील अधिकारी संतोष केंद्रे, लक्ष्मण पावडे आणि राम शिंदे या तिघांकडून सातत्याने मानसिक छळ होत असल्याचा खुलासा देखील त्यांनी यात केला.
या व्हिडिओच्या आधारे बडनेरा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अटक न झाल्याने मृतकाचे नातेवाईक आक्रमक झाले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्तारोको करत आरोपींना अटक करा अशी मागणी लावून ठेवली आहे. आरोपीला अटक करणार नाही तोपर्यंत शवविच्छेदन नाही अशी आक्रमक भूमिका देखील त्यांनी घेतली.
घटनेनंतर महापालिका आयुक्तांनी छळ केलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. काल रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन गृहाबाहेर मृतकाचे नातेवाईक आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्रींसह अनेकांनी ठिय्या देत ट्रॉसिटी गुन्हा दाखल करा आणि आरोपींना तात्काळ अटक करा ही मागणी केली.
हे देखील वाचा –
Central Railway Mega Block : ११ दिवसांच्या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत..









