Home / महाराष्ट्र / Dharavi Fire : धारावीत झोपडपट्टीत भीषण आग; आगीमुळे हार्बरचा रेल्वे मार्ग बंद

Dharavi Fire : धारावीत झोपडपट्टीत भीषण आग; आगीमुळे हार्बरचा रेल्वे मार्ग बंद

Dharavi Fire : धारावीतील ६० फूट रस्त्याजवळील नवरंग कंपाऊंड येथील झोपडपट्टीत आज दुपारी आग लागली. रेल्वे फाटकला लागूनच असलेल्या झोपडीत...

By: Team Navakal
Dharavi Fire
Social + WhatsApp CTA

Dharavi Fire : धारावीतील ६० फूट रस्त्याजवळील नवरंग कंपाऊंड येथील झोपडपट्टीत आज दुपारी आग लागली. रेल्वे फाटकला लागूनच असलेल्या झोपडीत आग लागल्यामुळे वांद्रे ते सीएसएमटी दरम्यानची हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. धारावीसारख्या दाटीवाटीच्या गजबजलेल्या झोपडपट्टीत आज हि आग लागली. नवरंग कपाऊंड येथील प्लॉट क्रमांक १ येथील झोपडपट्टीम ध्येही आग लागली होती.

नूर उपाहारगृहापासून जवळ असलेली ही झोपडपट्टी रेल्वे मार्गा लागतच आहे. पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गानां जोडणाऱ्या वांद्रे – सीएसएमटी मार्गावरील माहीम परिसरात ही झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीतील पहिल्या मजल्यावरती ही आग लागली. घटनास्थळी पोलिस, पालिकेच्या विभाग कार्यालयाचे पथक, रुग्णवाहिका असा ताफा तात्काळ दाखल झाला. दुपारी १.१५ च्या सुमारास ह्या आगीची तीव्रता अधिक वाढली. त्यामुळे अग्निशमन दलाने क्रमांक दोनची वर्दी दिली. या आगीत अद्याप जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. खबरदारीचा उपाय म्हणून वांद्रे – सीएसएमटी हार्बर मार्गावरील दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक दुपारी १.१५ पासून तात्काळ थांबवण्यात आली आहे.

हार्बर मार्गावरील माहीम आणि वांद्रेदरम्यान पूर्वेकडील अप हार्बर रेल्वे मार्गाला लागून असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये हि आग लागली आहे. हि आग लागल्याल्याने, सुरक्षिततेचा उपाय म्हणून ओव्हरहेड उपकरणांचा वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे. या आगीमुळे प्रवाशांना किंवा लोकलला धोका निर्माण झालेला नाही. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर लोकल सेवा सुरू केली जणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.


हे देखील वाचा –

Suicide Case : वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या