Eknath Shinde : आज डहाणू नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डहाणू येथे जाहीर सभा घेतली. आणि प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. त्यांनी यावेळी जनतेच्या मनात असणाऱ्या एका ज्वलंत प्रश्नाच निवारण केलं आहे. त्यांनी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. ही योजना म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष आहे असा विश्वास जनतेला दिला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, डहाणूमध्ये समुद्रापेक्षा माणसांची मन मोठी आहेत. गेले अनेक वर्ष मागासलेला हा तालुका आता विकासाच्या वाटेवर गेल्याशिवाय राहणार नाही. मी निकालावर बोलणार नाही, विकासावर बोलेन. डहाणूला जिल्ह्यात एक नंबर करायचे आहे. डहाणूमध्ये उद्योग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील आणि मच्छीमारांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील. प्रदूषणमुक्त उद्योग धोरण राबवून गृहनिर्माणाच्या माध्यमातून प्रकल्प उभे करून रोजगार निर्मितीला चालना देण्याचे काम सरकार करेल.
लाडकी बहीण योजना महत्त्वाची –
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेत बोलताना महाविकास आघाडीवरही जोरदार टीका केली आहे. जनतेच्या हिताच्या योजना थांबवणे, अडथळे निर्माण करणे आणि विकासाला ब्रेक लावणे ही त्यांची पद्धत असल्याचे देखील शिंदे म्हणाले. आम्ही केलेला विकास आणि त्यांनी केलेली राजकारणाची नकारात्मक शैली, यातला फरक डहाणूची जनता जाणते असं म्हणत त्यांनी माविआ वर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा विशेष उल्लेख करत ही योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे ते सांगतात शिवाय हि योजना दडपण्याचा प्रयत्नही काही राजकीय शक्ती करणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, लाडक्या बहिणी इतिहास घडवतात. महाराष्ट्रातील सत्तापालट लाडक्या बहिणींनी केला आहे, त्यांचा चमत्कार आपण विधानसभेत पाहिला आहे. लाडकी बहिण योजना काही लोकांनी बंद करण्याचा प्रयत्न केला, पण मी माझा शब्द पाळतो. असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.
हे देखील वाचा – Suicide Case : वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या









