Top 100 Cities : जगातील टॉप १०० शहरांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये यावेळी लंडन शहरानं सर्वोच्च स्थान पटकावलं आहे. रेझोनन्स कन्सल्टन्सी आणि इप्सॉस या संस्थांच्या वतीनं ही यादी जाहीर केली आहे. शहरामध्ये राहणार्या नागरिकांचं रहाणीमान, तेथील पायाभूत सुविधा, आणि मुख्य म्हणजे रोजगाराच्या संधी या आधारावर ही यादी तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सलग ११ व्या वेळी या यादीमध्ये लंडन शहरानं पहिलं स्थान मिळवलं आहे.
लंडन हे शहर जगभरातील लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिदू ठरले आहे. रहाणीमान, आणि रोजगाराच्या संधी याशिवाय पायाभूत सुविधांचा विकास या आधारावर लंडन शहरानं जगभरात प्रथम क्रमांक पटकवला आहे. तर दुसरा क्रमांक हा न्यूयॉर्क शहराने मिळवला आहे.
दरम्यान यावेळी आशिया खंडातील तीन शहरांना टॉप टेन यादीमध्ये स्थान मिळालं आहे, ज्यामध्ये टोकिओ चौथ्या क्रमांकावर आहे. तर सिंगापूर सहाव्या तसेच दुबई आठव्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये युरोपीयन शहरांचा दबदबा असलयाचे देखील पहायला मिळत आहे.
युरोपमधील अनेक शहरांनी जगातील टॉप शंभर शहरांच्या यादीमध्ये स्थान मिळवल्याचे दिसत आहे. या यादीमध्ये बंगळुरूने चांगलीच बाजी मारली आहे, या यादीत बंगळुरू शहर २९ व्या स्थानावर आहे, तर मुंबई ४० व्या स्थानावर आहे. आणि दिल्ली ५४ व्या स्थानावर असल्याचे दिसून येत आहे.
हे देखील वाचा –
India’s Blind Women Cricket : पहिल्या टी-२० विश्वचषकात भारताच्या अंध महिला क्रिकेटपटूंनी इतिहास रचला









