Bigg Boss 19 : बिग बॉस १९ हे सध्या चर्चेचा विषय बनला आहे. फॅमिली वीकमुळे ‘बिग बॉसचे आताचे काही भाग अतिशय चर्चेत आहेत. सगळ्या स्पर्धकांच्या कुटुंबीयांनी ‘बिग बॉसच्या घरात हजेरी लावली. तसेच या आठवड्यात शेहबाज बदेशा सोडून सगळेच नॉमिनेट झाले आहेत. शेहबाज घरचा कॅप्टन असल्या कारणामुळे तो नॉमिनेशनमध्ये न्हवता.
गौरव खन्ना, मालती चहर, फरहाना भट्ट, कुनिका सदानंद , अशनूर कौर, अमाल मलिक, तान्या मित्तल आणि प्रणित मोरे हे एकूण ८ स्पर्धक नॉमिनेट असून या वीकेंडच्या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री कुनिका सदानंद घराबाहेर जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
काही वृत्तानुसार या आठवड्यामध्ये कुणिका सदानंद ह्या बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याच्या बातम्यांना मोठे उधाण आले आहे. या बातम्यामुळे कुणिका सदानंद यांच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान या वीकेंडचा एक प्रेमोसुद्धा बाहेर आला आहे ज्या सलमान खानने पुन्हा एन्ट्री केल्याचे दिसत आहे. सलमानने पुनरागमन करताच, काही स्पर्धकांची शाळा घेतली आहे आणि काहींचे कौतुक देखील केले आहे. त्याने अमाल आणि शहबाज यांना देखील चांगलेच सुनावले आहे.
हे देखील वाचा –









