Accident Case : सोलापूर–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिवजवळ देवदर्शनासाठी निघालेल्या क्रुझर जीपचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
या गाडीतील प्रवासी सोलापूरवरुन नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी धाराशिवमधील अणदूर परिसरात त्यांच्या गाडीचे टायर्स अचानक फुटले. जीप रस्त्यावरील एका ट्रॅक्टरला धडकून उलटली, त्यामुळे मोठी जीवितहानी झाली. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. नागरिकांनी क्रुझर सरळ करून आत अडकलेल्यांना बाहेर काढले.
या अपघातात साक्षी बडे, सोनाली कदम, पूजा शिंदे यांचा मृत्यू झाला. जखमींमध्ये आकाश कदम, हरीकृष्ण शिंदे, माऊली कदम, अंजली आमराळे, ओमकार शिंदे, रुद्र शिंदे, कुणाल शिंदे, श्लोक शिंदे, बालाजी शिंदे, शिवांश कदम, कार्तिक आमराळे यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा –Bengaluru ATM : बेंगळुरूमध्ये एटीएम चोरी; पोलिस अधिकारी आणि कॅश व्हॅन इन्चार्ज अटकेत; ५.७ कोटी रुपये जप्त









