No Rift with Shinde – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझ्यात कोणताही दुरावा निर्माण झाला नाही, असा खुलासा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांवर टीकेचे बाण सोडले. आमच्यात माध्यमांनी दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाहीत, असा दावाही केला.
भाजपावर नाराज होऊन शिवसेना मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्यापासून दोघांमध्ये दुराव्याची चर्चा होत आहे.
गेल्या आठवडाभरापासून शिंदे-फडणवीस दुराव्याला दुजोरा देणाऱ्या काही घडामोडी घडल्या. त्यातच शिंदेंनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे भाजपा तसेच मुख्यमंत्री फडणवीसांची तक्रार केल्याचे सांगितले जात आहे.
याबद्दल फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आमच्या दोघांत कुठलाही दुरावा नाही. आम्ही आज, काल आणि त्यापूर्वीही परस्परांशी बोललो. एकत्र कार्यक्रमात सहभागी झालो होतो. ते कुठे जाणार, याची मला माहिती असते आणि मी कुठे जाणार हे त्यांना मी सांगतो.
कुठलाही दुरावा नाही, फक्त माध्यमांनी तसे चित्र निर्माण केले आहे. माध्यमे वेडी झाली आहेत. काही फुटेज दाखवून ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाहीत.
त्यांनी पुढे सांगितले की, परवाही मी आणि शिंदे साहेब हुतात्मा स्मारकावर अभिवादन करण्यासाठी गेलो. तिथे आल्यावरही भेटलो, जातानाही भेटलो.
कालच्याही कार्यक्रमात आमच्या दोघांमध्ये पुरस्कारार्थींना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्या होत्या. न बोलण्यासारखे काहीच घडलेले नाही. तुम्ही जे दाखवत आहात, अशी कुठलीही परिस्थिती नाही.
दरम्यान, या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरच शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये काल अमृता फडणवीस यांच्याशी संबंधित दिव्यज फाउंडेशनच्या कार्यक्रमावेळी २० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती भाजपाच्या गोटातून सांगितली जात आहे.
हे देखील वाचा –
रेल्वे मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय! वंदे भारत एक्सप्रेस ‘या’ नवीन स्थानकावर थांबणार
अर्णवच्या आत्महत्येला ठाकरे जबाबदार! नवी खेळी! भाजपाचे आंदोलन! मराठी भाषेचा मुद्दा उलटवला









