Home / महाराष्ट्र / Arnav Khaire suicide : अर्णव खैरेला मारहाण करणाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

Arnav Khaire suicide : अर्णव खैरेला मारहाण करणाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

Arnav Khaire suicide : कल्याणातील अर्णव खैरे आत्महत्येप्रकरणी कल्याण पोलिसांनी (Kalyan Police) लोकल ट्रेनमध्ये अर्णवला मारहाण करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध आत्महत्येस...

By: Team Navakal
Arnav Khaire suicide
Social + WhatsApp CTA

Arnav Khaire suicide : कल्याणातील अर्णव खैरे आत्महत्येप्रकरणी कल्याण पोलिसांनी (Kalyan Police) लोकल ट्रेनमध्ये अर्णवला मारहाण करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध आत्महत्येस (Arnav Khaire suicide) प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. रेल्वे पोलीस व स्थानिक पोलिसांकडून दोन स्वतंत्र तपास पथके या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

१८ नोव्हेंबर रोजी अर्णव खैरे लोकल ट्रेनने (Local train) प्रवास करत असताना मराठी (Marathi) का बोलला नाही, या कारणावरून काही अज्ञात व्यक्तींनी त्याला बेदम मारहाण केली होती. यानंतर अर्णव मानसिक तणावात असलेल्या अर्णवने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी अर्णवला मारहाण करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी दोन विशेष पथके तयार केली आहेत. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही (CCTV) फुटेज, तांत्रिक पुरावे आणि प्रवाशांची माहिती यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.

दरम्यान उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान काही टोळ्या सक्रिय झाल्या आहेत, असा दावा रेल्वे प्रवासी संघटनांनी केला आहे. या टोळ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. टिटवाळा, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या गर्दीच्या स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलिसांचे विशेष पथक तैनात करावे. दरवाजे अडवून ठेवणारे आणि प्रवाशांना त्रास देणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी. तसेच प्रत्येक फलाटावर गुन्हेगारी रोखण्यासाठी तक्रार नोंदणीची सुविधा सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या