Jarange Supporter Accident : बीडच्या दासखेड फाटा येथे एका चारचाकी गाडीने दुचाकीला (Motorcycle)धडक दिली. या अपघातात मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांचे कट्टर समर्थक असलेल्या अतुल घरत (Atul Gharat) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातातील चार चाकी गाडीवर आण्णा (Anna)असा मजकूर लिहिलेला आढळला आहे. यामुळे या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
अतुल घरत हे बीड (Beed) तालुक्यातील महाजनवाडीचे रहिवासी असून, पाटोदा येथून आपल्या गावी जात असताना दासखेड फाटा (Daskhed Phata) येथे हा अपघात झाला. धडक इतकी जबरदस्त होती की, ते जागीच ठार झाले.अपघातानंतर वाहनचालक तत्काळ फरार झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. या गाडीत पोलिसांचा गणवेश (police uniform)असल्याचेही सांगितले जात आहे. घरत हे जरांगे पाटील यांचे सक्रिय समर्थक असल्याने हा अपघात नसून जाणूनबुजून केलेला घातपात असावा, असा संशय व्यक्त केला जाता आहे.
या संशयाची सुई वाल्मीक आण्णा कराड (walmik Anna Karad) यांच्या दिशेने जात आहे. कारण मनोज जरांगे यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावरून कराडवर गंभीर आरोप केले होते. या कारणातून हा घातपात घडवलेला असू शकतो असे बोलले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
हे देखील वाचा –
रेल्वे मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय! वंदे भारत एक्सप्रेस ‘या’ नवीन स्थानकावर थांबणार
अर्णवच्या आत्महत्येला ठाकरे जबाबदार! नवी खेळी! भाजपाचे आंदोलन! मराठी भाषेचा मुद्दा उलटवला









