Home / महाराष्ट्र / Mushrif warns workers: कमी मते मिळाल्यास खैर नाही; मुश्रीफांचा कार्यकर्त्यांना इशारा

Mushrif warns workers: कमी मते मिळाल्यास खैर नाही; मुश्रीफांचा कार्यकर्त्यांना इशारा

Mushrif warns workers: कागल नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कार्यकर्त्यांना इशारा...

By: Team Navakal
Mushrif warns workers
Social + WhatsApp CTA

Mushrif warns workers: कागल नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे की, ज्या वॉर्डात मते कमी पडतील, त्यांनी आधीच ठरवून ठेवा. आपली खैर नाही. तसेच कोणीही निगेटिव्ह चर्चा केली आणि तसे कळले, तर त्यांचीही गय केली जाणार नाही.

कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नेते हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjitsinh Ghatge) एकत्र आल्यानंतर कोल्हापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत मुश्रीफ म्हणाले की, नेत्यांनी घेतलेले निर्णय पटोत किंवा न पटोत, कार्यकर्त्यांनी ते मान्य करून काम करणे आवश्यक आहे. कागलच्या दोन–तीन वॉर्डांमध्ये परिस्थिती टाईट करण्याची गरज आहे. दोन गट एकत्र आल्यानंतर राज्यभर चर्चेला उधाण आले आहे. मंत्र्याची अब्रू राखायची की घालवायची हे कार्यकर्त्यांच्या हातात आहे. युतीची बातमी आधीच फुटल्यामुळे काही जणांनी अतिरिक्त फॉर्म भरून मजा घेतली. मात्र, मजा करणारे मजा करतील, पण तुमचे भविष्य धोक्यात येणार.

यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी अपक्ष उमेदवारांना ४८ तासांचा पाठींबा देण्याचा अल्टिमेटम दिला. घाटगे म्हणाले की, आत्ताच पाठींबा देऊन सोबत आलात तर सगळे विसरू अन्यथा आम्हालादेखील वेगळा विचार करावा लागेल. तुमची कामे कशी होतात हेदेखील बघू. काही लोक म्हणतात गुलाल लावून राजेंकडे येतो. मात्र तसे काही चालणार नाही. त्यांचा आणि पक्षाचा संबंध संपला आहे.


हे देखील वाचा –

अर्णव खैरेला मारहाण करणाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

शिंदेंसोबत दुरावा नाही!फडणवीसांचा खुलासा

Web Title:
संबंधित बातम्या