Home / Uncategorized / Voter List Verification : मतदार यादी पडताळणीसाठी मनसे, उबाठा कार्यकर्ते घरोघरी

Voter List Verification : मतदार यादी पडताळणीसाठी मनसे, उबाठा कार्यकर्ते घरोघरी

Voter List Verification : महापालिका निवडणुकीसाठी (Municipal elections) प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. त्यातील दुबार मतदार आणि वॉर्ड पुनर्रचनेत...

By: Team Navakal
Voter List Verification
Social + WhatsApp CTA

Voter List Verification : महापालिका निवडणुकीसाठी (Municipal elections) प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. त्यातील दुबार मतदार आणि वॉर्ड पुनर्रचनेत मतदान केंद्र बदललेल्या मतदारांचा शोध घेण्यासाठी मनसे (Maharashtra Navnirman Sena), उबाठा (UBT)आणि काँग्रेस (Congress)कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पडताळणी सुरू केली आहे. त्यामुळे रविवारी अनेक सोसायट्या, वस्त्यांमध्ये राजकीय कार्यकर्ते मतदार यादी तपासताना दिसले.

पालिकेकडून (BMC) ५ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यापूर्वी दुबार मतदारांना नाव वगळण्यासाठी एक संधी दिली जाणार आहे. तसेच मतदार यादीवर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी २७ नोव्हेंबर ही अंतिम मुदत असल्याने सर्वच पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जात असल्याचे सांताक्रुझ पूर्व (Santacruz East), कलिना, बेहराम पाडा, मालवणी, मालाड, भांडुप आणि घाटकोपर या भागात दिसले.

वांद्रे पूर्व विधानसभा (Vandre East Assembly constituency)उबाठा पक्षाने प्रत्येक गटप्रमुखाला २५० घरांची पडताळणी करण्याची जबाबदारी दिली आहे. घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील मतदार, त्यांची नावे, मयत आणि नवीन मतदार तसेच वॉर्ड मतदान केंद्र यांची पडताळणी करून यादी अद्ययावत करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातून मिळालेल्या दुबार मतदारांची यादी तयार करण्यात आली असून जवळपास अडीच लाख दुबार मतदार असल्याचे सांताक्रुझमधील शिवसैनिकांनी सांगितले.

दुसरीकडे वांद्र्यातील भारतनगर, सरकारी (Government Colony), एमआयजी वसाहत, मराठा कॉलनी अशा मतदार केंद्रांवर मतदारयादीत मोठा घोळ दिसून येत आहे. अनेक त्रुटी कार्यकर्त्यांच्या हाती लागल्या असून सर्व माहिती शिवसेना आणि मनसे शाखांमध्ये संकलित केली जात आहे.


हे देखील वाचा –

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी टिपले इंटरस्टेलर धूमकेतू 3I/Atlas चे अचूक चित्र; माऊंट अबू येथील दुर्बिणीतून कॅमेऱ्यात केले कैद

आण्णा लिहिलेल्या गाडीची धडक; मनोज जरांगेंच्या समर्थकाचा मृत्यू

अर्णवच्या आत्महत्येला ठाकरे जबाबदार! नवी खेळी! भाजपाचे आंदोलन! मराठी भाषेचा मुद्दा उलटवला

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या