Japan And China Conflict : एका देशाचा वाद संपला कि लगेच दुरसे देश लढाईच्या तयारीत असतातच असं म्हणायला हरकत नाही. असाच आणखीहन एक वाद चर्चेत आहे तो म्हणजे भारताच्या सीमेला लागून असलेल्या चीन आणि जपानचा. या देशांमधला तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आशिया खंडातील या दोन्ही देशांमधील संबंध बिघभरसे चांगले नाही आहेत.
हे संभंध इतके जास्त बिघडले कि चीनने आपल्या देशातील लोकांना जपानला न जाण्याचा सल्ला दिला आहे. इतकंच न्हवे तर जपानमधील चित्रपटांनाही चीनमध्ये बंदी घालण्यात आली आहे. बर हा वाद इतक्यावरच संपलेला नाही आहे, चीनने जपानमधील सागरी खाद्यपदार्थांच्या आयातीवरही निर्बंध लादले आहेत. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखीनच ताणले गेले असल्याचे दिसून येत आहेत. पण असं म्हणतात ना दोघांच्या भांडणात तिसऱ्याला कायम लाभ होतो. असच काहीस भारता सोबत देखील झालं आहे. या भांडणा दरम्यान चीन आणि जपानमधील संघर्षाचा भारताला फायदा होत असल्याचे समोर आले आहे.
काही वृत्तानुसार; जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांनी केलेल्या एका विधानामुळे या दोन्ही देशांमध्ये वाद उफाळला आहे. चीनने तैवानवर लष्करी कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास जपान संरक्षणासाठी तिथे आपले सैन्य पाठवेल, असे वक्तव्य ताकाइची यांनी याआधी केले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे चीनने लगेचच आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे चीनने जपानला थेट इशारा दिला आहे.
साने ताकाइची यांच्या अलीकडच्याच विधानामुळे चीन अधिकच आक्रमक झाले आहे. तैवान हा आपल्याच देशाचा भाग असल्याचे देखील चिनी नेत्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेवर जपानी नेत्यांनी टीका केल्याने दोन्ही देशांमधील संभंध अधिक बिघडले. ताकाइची यांनी आपले वक्तव्य तातडीने मागे घ्यावे; अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा गंभीर स्वरूपाचा इशाराच चीनने दिला आहे. आणि या उलट जपानच्या पंतप्रधानांनी माघार घेण्यास नकार दिला असून, ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
तैवानवरून चीन आणि जपान यांच्यामध्ये वाढलेल्या तणावाचा भारताला चांगलाच फायदा होत आहे. चीनने बुधवारी जपानमधील सी फूडच्या (समुद्री खाद्यपदार्थ) आयातीवर बंदी घातल्याने भारतीय निर्यातदारांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चीनच्या या निर्णयामुळे त्यांच्या बाजारपेठेत सीफूडचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र ही मागणी पूर्ण करण्यासाठी चीनकडे फार कमी पर्याय उपलबध आहे ज्यामध्ये भारताचा समावेश देखील आहे. त्यामुळे या सीफूटचा साठा पूर्ण करण्यासाठी चीन भारतासारख्या देशांकडे अधिकाधिक वळत आहे. परिणामी, भारतीय सीफूड कंपन्यांचे शेअर्स देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.
आधीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा सामना करणाऱ्या या क्षेत्रासाठी हा मोठा दिलासा मिळायचे दिसून येत आहे. भारताला आधीच टॅरिफचा धोका होता. रशियाकडून खजिन तेलाची खरेदी सुरूच ठेवल्याने अमेरिकेने भारतावर ५० टक्के अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लादले आहे, या टॅरिफमुळे भारतीय कोळंबी आणि मत्स्य निर्यातीवर याचा चांगलाच परिणाम झाला होता. गेल्या महिन्यात (ऑक्टोबरमध्ये) अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत ९%पर्यंत घट झाली होती; पण चीनच्या अचानक वाढलेल्या मागणीने भारतीय मच्छीमारांना जणू नवीन आशेचा किरण मिळाल्याचे दिसून येत आहे.
हे देखील वाचा –









