Home / महाराष्ट्र / Uddhav Thackeray And Raj Thackeray : मनसे आणि ठाकरेंच्या युतीची अधिकृत घोषणा कधी?

Uddhav Thackeray And Raj Thackeray : मनसे आणि ठाकरेंच्या युतीची अधिकृत घोषणा कधी?

Uddhav Thackeray And Raj Thackeray : आगामी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार असे निश्चित मानले जात आहे. मात्र याबद्दल...

By: Team Navakal
Uddhav Thackeray And Raj Thackeray
Social + WhatsApp CTA

Uddhav Thackeray And Raj Thackeray : आगामी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार असे निश्चित मानले जात आहे. मात्र याबद्दल मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून अधिकृत अशी घोषणा अद्याप केलेली नाही आहे. मागच्या काही काळापासून ठाकरे बंधूंच्या भेटी वाढल्या आहेत. प्रत्येक राजकीय मुद्द्यांमध्ये त्यांनी एकमेकांना जाहीरपणे पाठिंबा देखील दिला. पण एवढं सगळं असूनसुद्धा अजूनही अधिकृतरित्या युतीची घोषणा का नाही? असा सवाल आता जनतेच्या मनात उध्दभवताना दिसत आहे. आणि आता यावर अनेक तर्क वितर्क मांडले जात आहेत.

आता यांच्यात जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरला आहे. शिवाजीपार्क येथील स्मृतीस्थळावर झालेल्या दोन्ही बंधूंच्या गाठी-भेटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जागावाटपासंदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी संवाद साधला असल्याच्या बातम्या आहेत.

या जागावाटपाबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आले. या बैठकांमध्ये ठाकरे गट आणि मनसेचे काहीच पदाधिकारी सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. एकदा जागावाटप निश्चित झाले की तत्काळ युतीची घोषणा करणार असल्याचे देखील बोलले जात आहे. पण तरीही यावर काही निश्चितता नाही.

वरून सगळे कितीही सोबर दिसत असले तरी आतली खरी परिस्थिती बाबत काही ठोस माहिती नाही. आता अवघ्या जनतेचं लक्ष लागून राहिले आहे ते म्हणजे मनसे आणि ठाकरेंच्या युतीवर. त्यामुळे आता युतीची अधिकृत घोषणा कधी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हे देखील वाचा –

Voter List Verification : मतदार यादी पडताळणीसाठी मनसे, उबाठा कार्यकर्ते घरोघरी

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या