Home / महाराष्ट्र / Ajit Pawar : अजित पवारांच्या पक्षाला खिंडार?

Ajit Pawar : अजित पवारांच्या पक्षाला खिंडार?

Ajit Pawar : राज्यात निवडणुकीच्या पार्शवभूमीवर महायुतीमध्ये मागच्या काही काळापासून नाराजी पाहायला मिळाली. शिंदेची नाराजी तर लपून राहिली नाही. एकमेकांच्या...

By: Team Navakal
Ajit Pawar
Social + WhatsApp CTA

Ajit Pawar : राज्यात निवडणुकीच्या पार्शवभूमीवर महायुतीमध्ये मागच्या काही काळापासून नाराजी पाहायला मिळाली. शिंदेची नाराजी तर लपून राहिली नाही. एकमेकांच्या पक्षातील पदाधिकारी माजी नगरसेवक फोडण्यापासून या राजकारणाला सुरुवात झाली. यादरम्यान शिंदेंच्या पक्षातील मंत्री आक्रमक होताना देखील दिसले. यासंदर्भातील नाराजी मागच्या काही दिवसांपासून जास्त तीव्रतेने जाणवायला लागली. याच नाराजीला घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिंदेंच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला.

आणि त्यांची ही नाराजी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर देखील बोलून दाखवली पण मुख्यमंत्र्यांकडून त्यांना हवे तसे पाठबळ मिळालं नाही. आणि यानंतर एकनाथ शिंदेंनी थेट दिल्लीत अमित शहांची भेट घेतली. आणि या भेटीमध्ये शिंदेंनी रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याच्या देखील चर्चा आहेत. पण यावर अमित शहांनी त्यांनाच तंबी दिल्याची माहिती समोर येत आहे. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमधील वाढत्या तणावावर देखील आम्ही चहा आणि नाराजी व्यक्त केली आहे.

आणि आता एक नवीन मोठा ट्विस्ट आल्याची देखील बातमी समोर येत आहे. भाजपने महायुतीमधील मित्रपक्ष आणि शहरातील प्रमुख विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार पक्षाला धक्का देण्याची तयारीत आहे. काही वृत्तांच्या माहितीनुसार अजित पवार पक्षातील काही माजी नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील काही नगरसेवक म्हणजेच एकूण दहा ते बारा माजी नगरसेवक लवकरच भाजपा मध्ये जाणार असल्याच्या चर्चांना मोठ उधाण आल आहे.

या निवडणुकीमध्ये महायुती मधील काही माजी नगरसेवकांची म्हणजेच अजित पवारांच्या पक्षांमधील काही माजी नगरसेवकांची आजोबा सोबत युती व्हावी अशी इच्छा होती. पण भाजपाने महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले. आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील आपल्या राजकीय हालचालींचा वेग वाढवला आहे. युती न होण्याच्या बातमीने अजित पवारांच्या पक्षातील माजी नगरसेवकांची अस्वस्थता यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंच्या पाठोपाठ अजित पवारांची देखील तीव्र नाराजी पाहायला मिळणार का हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.


हे देखील वाचा – Voter List Verification : मतदार यादी पडताळणीसाठी मनसे, उबाठा कार्यकर्ते घरोघरी

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या