Home / आरोग्य / Drink Lemon Water : थंडीच्या दिवसात लिंबू पाण्याचे सेवन करावे का?

Drink Lemon Water : थंडीच्या दिवसात लिंबू पाण्याचे सेवन करावे का?

Drink Lemon Water : उन्हाळ्यात सर्रास लोक लिंबू पाणी पिण्यावर भर देतात काहींना तर लिंबू पाणी इतकं आवडत कि ते...

By: Team Navakal
Drink Lemon Water
Social + WhatsApp CTA

Drink Lemon Water : उन्हाळ्यात सर्रास लोक लिंबू पाणी पिण्यावर भर देतात काहींना तर लिंबू पाणी इतकं आवडत कि ते हिवाळ्यातही लिंबू पाणी पितात. लिंबू हे व्हिटॅमिन सी चा खजिना आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र, लिंबामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखे महत्त्वाचे मिनरल्स देखील असतात. या सर्व पोषक तत्वांच्या एकत्रितपणामुळे लिंबू शरीरासाठी अत्यंत फायदेमंद ठरते. उन्हाळ्यात लिंबू पाणी पिऊन शरीराला थंडावा मिळतो तसेच शरीरातील ऊर्जा देखील यामुळे वाढते. परंतु थंडीत लिंबू पाणी पिऊ पियावे कि नाही याबाबतचा संभ्रम बऱ्याच जणांमध्ये असतो.

तुम्हाला लिंबू पाणी आवडत असेल तर तुम्ही थंडीच्या दिवसांत लिंबू पाणी पिण्याचे असेल तर, ते कोमट पाण्यात मिसळून प्यावे. त्याचबरोबर, सकाळी लवकर न पिता, १० ते ११ वाजायच्या सुमारास लिंबू पाण्याचे सेवन करावे.

लिंबू पाणी शरीराला डिटॉक्स (Detox) करण्यास उत्तमरित्या मदत करते. त्यामुळे शरीरात साचलेले विषारी पदार्थ (Toxins) अगदी सहज बाहेर पडतात. थंडीत अनेकदा बिघडलेल्या पचनसंस्थेसाठी लिंबू पाणी प्रचंड उपयुक्त आहे. लिंबू पाण्याने वजन कमी (Weight Loss) होण्यास मदत मिळते. लिंबू पाणी त्वचेला आतून नैसर्गिकरित्या चमकदार बनवण्यास अधिक महत्वाची भूमिका बजावते.

जरी लिंबू कितीही फायद्याचे असले तरी त्याचे अतिसेवन हानिकारक ठरू शकते. थंडीत जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिल्यास दातांमध्ये संवेदनशीलता अधिक (Sensitivity) वाढू शकते. यामुळे आम्लपित्त (Acidity) किंवा पोटाशी संबंधित समस्या वाढण्याची दाट शक्यता असते.


हे देखील वाचा –

Miss Universe : मिस मेक्सिको फतिमा बॉश मिस युनिव्हर्स 2025 ची विजेती! ‘डंब’ म्हणाऱ्यांना दिले उत्तर

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या