Ajit Pawar Statement : पुणे जिल्ह्यातील माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. 18 उमेदवार निवडून देण्याची मागणी करताना अजित पवार म्हणाले, “तुम्ही जर ‘काट’ मारली, तर मीही ‘काट’ मारणार. तुमच्या हातात मताचा अधिकार आहे, तर माझ्या हातात निधीचा अधिकार आहे, आता बघा काय करायचं ते.”
विरोधकांकडून तीव्र टीका झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले.
फडणवीसांकडून विरोधकांना उत्तर आणि विकासाची ग्वाही
पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या विधानाचा अर्थ वेगळा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “सहकारी नेते अनेकदा भाषणात काही गोष्टी बोलतात, पण त्याचा उद्देश भेदभाव करण्याचा नसतो.” मुख्यमंत्री म्हणून त्यांनी संपूर्ण राज्याच्या विकासाची जबाबदारी महायुतीची आहे, असे स्पष्ट केले. निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास केला जाईल आणि असा कोणताही भेदभाव होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या दुराव्याच्या बातम्यांवर फडणवीस संतापले. या चर्चांना ‘वेड्यांचा बाजार’ संबोधून त्यांनी सांगितले की, त्यांच्यात कोणताही दुरावा नाही. न बोलण्यासारखे काहीही घडलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांचे विधानावर स्पष्टीकरण
अजित पवार यांनी आपल्या भाषणातून आपण काय ‘साधू-संत’ नसल्याचे सांगत खुलेपणाने आपली भूमिका मांडली. “माझ्याकडे 1400 कोटींचे बजेट आहे आणि ओळखीचा वाढपी असेल तर अधिक वाढतोच,” असे सूचक विधान त्यांनी केले. माळेगावमध्ये झालेली युती केवळ विकासासाठी आहे आणि यात कोणत्याही वाटाघाटी झालेल्या नाहीत.
पुण्यातील बैठकीनंतर त्यांनी आपल्या विधानावर अधिक स्पष्टीकरण दिले. तेजस्वी यादव यांनीही बिहार निवडणुकीत निवडून दिल्यास जास्त निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे निवडणुकीच्या भाषणांमध्ये असे आश्वासन द्यावे लागते, असे म्हणत त्यांनी आपल्या विधानाचा बचाव केला.
हे देखील वाचा – Raj Thackeray : ‘मराठी माणसांसाठी ही निवडणूक शेवटची असेल…’; राज ठाकरेंचे मुंबई महापालिका निवडणुकीवर भाष्य









