Home / महाराष्ट्र / Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे राऊतांच्या घरी तब्येतीबाबत विचारपूस केली

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे राऊतांच्या घरी तब्येतीबाबत विचारपूस केली

Uddhav Thackeray: उबाठा (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची त्यांच्या राहत्या घरी जाऊन...

By: Team Navakal
Uddhav Thackeray
Social + WhatsApp CTA

Uddhav Thackeray: उबाठा (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. राऊत गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या कारणामुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. तब्येतीत बिघाड झाल्याने आपण तात्पुरती विश्रांती घेत असल्याचे राऊतांनी समाज माध्यमावरून सांगितले होते.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भांडूप येथील मैत्री निवासस्थानी जात राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ठाकरे आणि राऊत यांच्यात सुमारे १५ ते २० मिनिटे चर्चा झाली. आमदार मिलिंद नार्वेकरही ठाकरेंसोबत होते. राऊतांचे भाऊ, आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी बंगल्याबाहेरच ठाकरेंचे स्वागत केले. तत्पूर्वी, आज सकाळी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनीही संजय राऊत यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली होती.

भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हल्ली मी संजय राऊत यांना रोज फोन करत नाही. आता रोज सुनील यांना संजय राऊत यांच्या प्रकृतीबद्दल विचारण्यासाठी छळत असतो. संजय राऊतांना मला खूप दिवसांपासून भेटायचे होते आणि आज भेट झाली. भेटून चांगले वाटले. संजय राऊतही फ्रेश दिसले आणि लवकरच तलवार घेऊन मैदानात दिसतील.

Web Title:
संबंधित बातम्या