Home / महाराष्ट्र / MNS : काळाचौकीत मराठी माणसाची औकात काढली ? मनसे आक्रमक

MNS : काळाचौकीत मराठी माणसाची औकात काढली ? मनसे आक्रमक

MNS – मुंबईत मराठी माणसाची औकात काढल्याने ठेकेदाराच्या विरोधात मनसेने (MNS) आक्रमक भूमिका घेतली.या प्रकरणामुळे कल्याणमध्ये अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणानंतर...

By: Team Navakal
MNS
Social + WhatsApp CTA

MNS – मुंबईत मराठी माणसाची औकात काढल्याने ठेकेदाराच्या विरोधात मनसेने (MNS) आक्रमक भूमिका घेतली.या प्रकरणामुळे कल्याणमध्ये अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणानंतर सुरू असलेल्या मराठी-अमराठी वादामुळे राज्यात वातावरण पुन्हा तापले.

काळाचौकी आंबेवाडी परिसरात सुरू असलेल्या बांधकामामुळे एका गाडीवर रंग पडल्याची घटना झाली. ज्यामुळे वाहन मालकाने ठेकेदाराकडून नुकसान भरपाई मागितली होती. सहा महिन्यांनंतरही ठेकेदाराने भरपाई न दिल्याने वाद वाढला. ठेकेदाराने वाहन मालकाला आक्षेपार्ह भाषा वापरून, मराठी माणसाची औकात आहे का? असे वक्तव्य केले. ज्यामुळे गाडी मालक संतापला आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला.मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचताच ठेकेदार आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ठेकेदाराविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. यादरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.


हे देखील वाचा

उद्धव ठाकरे राऊतांच्या घरी तब्येतीबाबत विचारपूस केली

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या