BJP- सातारा जिल्ह्यात महायुती तुटली असून वेगवेगळ्या पक्षात असलेल्या आजी-माजी पालकमंत्र्यांनी एकत्र येत भाजपविरोधात (BJP) भक्कम आघाडी उभारली आहे.त्यामुळे जिल्ह्यावर कब्जा करू पाहणार्या भाजपची कोंडी झाली आहे. कराड,फलटण आणि इतर नगरपालिकांच्या निवडणुकीत या संयुक्त रणनीतिचे प्रकर्षाने दर्शन घडत आहे.
जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्रीपद सांभाळल्यानंतर या पदाचे राजकीय वजन आणखी वाढले.त्यानंतर आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार,सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील आणि महायुती सरकारमधील पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही जिल्ह्यात आपली चांगली छाप पाडली.विशेष म्हणजे, पक्ष वेगळे असले तरी या नेत्यांमध्ये कायमच समन्वय राहिल्याचे विविध निवडणुकांमधून दिसून आले आहे.कराड नगरपालिका निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष,आमदार अतुल भोसले यांना रोखण्यासाठी यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडी एकत्र आली असून नुकताच त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत झाला. तर फलटणमध्ये भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकवटले असून त्या आघाडीचे नेतृत्वदेखील देसाई स्वतः करत आहेत. रविवारी त्यांनी फलटणमधील राजे गटाच्या प्रचाराचा शुभारंभ केला.जिल्हाभर भाजपला रोखण्यासाठी आजी-माजी पालकमंत्र्यांनी अक्षरशः जिल्हा पिंजून काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे
————————————————————————-
देखील वाचा
पुण्यात अजित पवार यांचा आणखी एक भूखंड घोटाळा ? ५०० कोटींची जमीन २९९ कोटींना विकली
मनसेला माविआमध्ये घेण्याची तयारी ! शरद पवार काँग्रेसची समजूत काढणार









