Home / देश-विदेश / Meerut murder : पतीच्या हत्येची आरोपी मुस्कान आई बनली

Meerut murder : पतीच्या हत्येची आरोपी मुस्कान आई बनली

Meerut murder : आपल्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या निळ्या ड्रममध्ये कोंबून त्यावर सिमेंट काँक्रिट टाकल्याचा आरोप असलेल्या मुस्कानने...

By: Team Navakal
Meerut murder
Social + WhatsApp CTA

Meerut murder : आपल्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या निळ्या ड्रममध्ये कोंबून त्यावर सिमेंट काँक्रिट टाकल्याचा आरोप असलेल्या मुस्कानने कोठडीतच (Muskan becomes a mother) मुलीला जन्म दिला आहे.

१९ मार्च रोजी मुस्कानला मेरठमध्ये पोलिसांनी अटक केली.पोलिसांनी तिच्यावर ठेवलेला आरोप देशभरात चर्चेचा विषय ठरला होता.निळा ड्रमवाली खुनी,अशी मुस्कानची ओळख बनली होती.तिने आपला प्रियकर साहील याच्या मदतीने ३ मार्च रोजी पती सौरभ रस्तोगी याची हत्या करून त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या निळ्या ड्रममध्ये कोंबला आणि पुरावा मिटवून टाकण्यासाठी तो ड्रम सिमेंट काँक्रिटचे मिश्रण टाकून बंद केला. एवढेच नव्हे तर पतीची निर्घृण हत्या केल्यानंतर जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात मुस्कान साहीलसोबत मनालीला गेली होती,१७ मार्च रोजी मुस्कान जेव्हा मनालीहून परतली तेव्हा घरमालकाने तिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे सांगून तिला घराची साफसफाई करण्यास सांगितले.तेव्हा प्लास्टिकच्या ड्रममध्ये सौरभचा मृतदेह आढळून आला,असा पोलिसांचा दावा आहे.

मुस्कानला अटक केल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे आढळून आले होते.योगायोग म्हणजे २४ नोव्हेंबर रोजी पती सौरभच्या जन्मदिनीच तिने मुलीला जन्म दिला आहे.मुलीचे नाव तिने राधा (Radha) ठेवले आहे.

मुस्कानने मुलीला जन्म दिल्यानंतर आता ती मुलगी नेमकी कोणाची, पती सौरभची की प्रियकर साहीलची,असा प्रश्न निर्माण झाला आहे. सौरभच्या कुटुंबियांनी मुलीची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली आहे. चाचणीमध्ये जर मुलगी सौरभची असल्याचे निष्पन्न झाले तर त्या मुलीची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी कुटुंबियांनी दर्शविली आहे.त्यामुळे लवकरच मुलीची डीएनए चाचणी केली जाणार आहे.


हे देखील वाचा

पश्चिमबंगालमध्ये नव्या बाबरीची पायाभरणी

Web Title:
संबंधित बातम्या