Home / महाराष्ट्र / Vasai School Girl death: १०० उठाबशामुळे झालेल्या मुलीच्या मृत्यूची चौकशी करा ! हायकोर्ट रजिस्ट्रारचे आयुक्तांना निर्देश

Vasai School Girl death: १०० उठाबशामुळे झालेल्या मुलीच्या मृत्यूची चौकशी करा ! हायकोर्ट रजिस्ट्रारचे आयुक्तांना निर्देश

Vasai School Girl death: वसईतील एका शाळेत सहावीत शिकणाऱ्या एका मुलीला (Vasai School Girl death) शाळेत यायला उशिर झाला म्हणून...

By: Team Navakal
Vasai School Girl death
Social + WhatsApp CTA

Vasai School Girl death: वसईतील एका शाळेत सहावीत शिकणाऱ्या एका मुलीला (Vasai School Girl death) शाळेत यायला उशिर झाला म्हणून पाठीवर दप्तर ठेवून शंभर उठाबशा काढायला लावल्याने तिचा मृत्यू झाला.या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी (SIT) स्थापन करावी अशी मागणी मुख्य न्यायमूर्तीना पत्र लिहून एका वकीलाने केली आहे.याची गंभीर दखल घेत या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, असे निर्देश हायकोर्ट (High Court) रजिस्ट्रारनी मीरा-भाईंदर तसेच वसई-विरार पोलीस आयुक्त (directs Commissioner) व वसई-विरार पालिकेला दिले आहेत.

आशिका नावाच्या या मुलीला तिच्या पाठीवर दफ्तर ठेवून शंभर उठाबशा काढण्यास सांगण्यात आले. शाळेतून घरी आल्यानंतर आशिका हिला पाठदुखीचा त्रास होऊ लागला.जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच १४ नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. आरोपीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही तसेच शाळेकडूनही बचावात्मक पवित्रा घेतला जात असल्याने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करत वकील स्वप्ना कोदे यांनी हायकोर्टाचे मुख्य न्या. चंद्रशेखर यांना पत्र लिहिले. राज्य सरकार तसेच पोलीस महासंचालकांना या प्रकरणात नोटीस बजावण्यात यावी, त्याच बरोबर शाळा व्यवस्थापन व दोषी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

याची गंभीर दखल घेत हायकोर्ट रजिस्ट्रारने चौकशीचे निर्देश दिले आहेत. वसई-विरार आणि मिरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त , वसई-विरार पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून चौकशीच्या तपशिलाची माहिती अ‍ॅड.कोदे यांना द्यावी, असे निर्देश रजिस्ट्रारनी दिले आहेत.


हे देखील वाचा 

पश्चिमबंगालमध्ये नव्या बाबरीची पायाभरणी

पतीच्या हत्येची आरोपी मुस्कान आई बनली

Web Title:
संबंधित बातम्या