Shevga pods price hike: कांदा ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आणत असताना आता घेवडा, हिरवी मिरची,मटार, गवार,फरसबी आदी भाज्यांनीही शंभरी ओलांडली आहे. शेवग्याच्या शेंगा तर पार ४०० रुपये किलोवर (Shevga pods price hike) गेल्या आहेत.त्यामुळे आता इडली आणि डोशासोबत लागणारे सांबार महाग होणार असे उडुपी हॉटेल व्यावसायिक सांगत आहेत.
राज्यातील अवकाळी पावसामुळे यंदा शेवग्याचे उत्पादन फारच कमी झाले आहे. नवी मुंबई बाजार समिती आवारात शेवग्याच्या शेंगाची आवक कमी असल्याने या शेंगांचा दर ४०० रुपये किलो झाला आहे. बदलत्या हवामानामुळे नवीन पिकाचा हंगामही लांबला आहे.कल्याण घाऊक भाजी बाजारात शेवग्याच्या शेंगा ऑक्टोबर महिन्यापर्यंत १००-१२० रुपयांना मिळत होत्या. परंतु आता मात्र कोरोना काळातही जेवढे वाढले नव्हते तेवढे भाव वाढले आहेत.त्यामुळे विक्रेत्यांनीही घाऊक बाजारातून शेंगा आणणे काही प्रमाणात थांबवले आहे,कारण एवढ्या महाग भाज्या ग्राहक विकत घेत नाहीत आणि सुकल्यावर त्या फेकून द्याव्या लागतात. ठाण्यातही शेवग्याच्या शेंगांचा भाव गेल्या काही आठवड्यांत १२० रुपये किलोवरून ४०० रुपयांवर गेला आहे. शेवग्याची घाऊक खरेदी उडुपी हॉटेल व्यावसायिक करत असतात. इडली आणि डोसा याबरोबर मिळणार्या सांबारामध्ये शेवग्याच्या शेंगा हमखास लागतात. त्याच आता महाग झाल्याने सांबार महागण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा –
पश्चिमबंगालमध्ये नव्या बाबरीची पायाभरणी
पतीच्या हत्येची आरोपी मुस्कान आई बनली
१०० उठाबशामुळे झालेल्या मुलीच्या मृत्यूची चौकशी करा ! हायकोर्ट रजिस्ट्रारचे आयुक्तांना निर्देश









