Devendra fadnavis- आम्ही प्रभू श्रीरामाला मानणाऱ्या पक्षात असून आमचा उमेदवारही जय श्रीरामवाला आहे. त्यामुळे आम्ही लंकेत राहत नसून लंका पेटण्याचे काम करणार आहोत, असा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पलटवार केला. ते आज डहाणू येथील सभेत बोलत होते.
डहाणू नगर परिषद निवडणुकीत भाजपा विरुद्ध शिंदे गट यांच्यातच अत्यंत प्रतिष्ठेची लढत होत आहे. गेल्या २२ नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डहाणू येथील सभेत म्हणाले की, एकाधिकारशाहीच्या, अहंकाराच्या विरोधात आपण एकत्र आला आहात. अहंकार तर रावणासारखा होता, रावणाची लंका अहंकारामुळे जळून खाक झाली आणि तुम्हाला (जनतेला) दोन तारखेला तेच काम करायचे आहे. यावरच आता मुख्यमंत्री फडणवीसांनी नामोल्लेख टाळत पलटवार केला आहे.
भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत राजपूत यांचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, कोणी काही म्हणाले असेल, तर तुम्ही लक्ष देऊ नका. कोणी लंका जाळू वगैरे म्हणाले असेल. पण आपण लंकेत राहतच नाही. आपण तर रामाचे अनुयायी आहोत. रावणाचे आहोत का? तुमचे नाव तर भरत आहे. रामाचा छोटा भाऊ भरत. मग रामाच्या भावाची लंका असू शकते का? अशा गोष्टी निवडणुकीत बोलाव्या लागतात. प्रभू श्रीरामाला मानणारा पक्ष, त्या पक्षाचा उमेदवार भरत. अरे, लंका तर हा पेटवणार आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
शेवगा शेंग ४०० रुपये किलो इडलीचे सांबार महागणार
१०० उठाबशामुळे झालेल्या मुलीच्या मृत्यूची चौकशी करा ! हायकोर्ट रजिस्ट्रारचे आयुक्तांना निर्देश









