Board a taxi- टॅक्सीचालकांसोबत अनेकदा प्रवाशांकडून गैरवर्तन केले जाते किंवा असभ्य भाषा वापरली जाते. याच अनुभवांना कंटाळून एका टॅक्सी चालकाने थेट आपल्या टॅक्सीमध्ये ( Board a taxi) एक ‘नियमावली’ चा बोर्ड लावला आहे! त्यामध्ये त्याने आपणास ‘भैय्या’ म्हणू नका, असेही म्हटले आहे.
या टॅक्सी चालकाने प्रवाशांसाठी लावलेला सहा नियमांचा बोर्ड सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विशेषतः ‘आम्हाला भैय्या म्हणू नका’ आणि ‘नम्रपणे बोला’ यांसारख्या नियमांमुळे टॅक्सी चालक आणि प्रवाशांमधील वर्तनाचे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बंगळुरू शहरात प्रवास करत असताना एका रेडिट युजरला एका कॅबमध्ये नियम लिहिलेला बोर्ड दिसला.
त्याने हा फोटो काढला आणि सोशल मीडियावर टाकला. बोर्डावर लिहिलेल्या नियमानुसार, तुम्ही कॅबचे मालक नाही. (तुम्ही फक्त प्रवासी आहात, हे लक्षात ठेवावे), कॅब चालवणारी व्यक्तीच कॅबची मालक आहे. (मालमत्तेचा आदर करा), नम्रपणे बोला आणि आदर दाखवा. (सभ्य भाषा वापरा), दरवाजा हळू बंद करा. (वाहनाचे नुकसान करू नका), तुमचा ‘अॅटिट्यूड’ खिशात ठेवा, कारण तुम्ही आम्हाला जास्त पैसे देत नाही, त्यामुळे आम्हाला तो दाखवू नका. (प्रवासाचे भाडे दिल्याने उद्धटपणा करण्याचे लायसन्स मिळत नाही) आणि आम्हाला ‘भैय्या’ म्हणू नका. (समानतेने वागा)
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
पश्चिमबंगालमध्ये नव्या बाबरीची पायाभरणी
आम्ही रामाचे अनुयायी आहोत लंका तर भरत पेटवणार आहे!मुख्यमंत्री फडणवीसांचा शिंदेंवर पलटवार









