Sachin Gujar Kidnapped CCTV : निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्याच्या राजकारणाची दिशा झपाट्याने बदलताना दिसत आहे. अनेक घटना या दरम्यान घडताना दिसत आहेत. याच निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान एक खळबळजनक घटना घडली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. गुजर यांना आरोपींनी टिळकनगर परिसरात एका निर्जनस्थळी नेऊन बेदम मारहाण केली. दरम्यान, गुजर यांचं अपहरण करतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.
गुजर हे सकाळी सात वाजताच्या दरम्यान मॉर्निंग वॉकला निघाले होते आणि अचानक एक कार त्यांच्याजवळ येऊन थांबली. या कारमधून उतरलेल्या आरोपींनी त्यांना जब्बर मारहाण केली.
उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार तथा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी या अपहरणाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. वर्षा गायकवाड यांनी पोलीस व राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाल्या वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड यांनी फेसबूक पोस्ट करत पोलीस आणि राज्यसरकारवर जोरदार संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणतात “राज्यातले पोलीस झोपले आहेत का? अहिल्यानगर येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं आज सकाळी अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने मारहाण होत असेल तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था तितकी सुरक्षीत आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत आहे. गृहमंत्री आतातरी जबाबदारी घेणार आहेत का? निवडणुक तोंडावर असतानाच विरोधकांवर हल्ले होत आहेत. गृहखात्याचे कारभार झेपत नसेल तर दुसऱ्या कुणाला जबाबदारी द्या असा संताप त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीच्या पार्शवभूमीवर अशी गोष्ट घडण हे फार भयंकर म्हणावे लागेल. दिवसाढवळ्या अपहरण करून मारहाण करणे यामुळे राज्याच्या सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हे देखील वाचा-
UNESCO : गौरवास्पद! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे युनेस्कोच्या मुख्यालयात अनावरण









