Home / देश-विदेश / Donald Trump : व्हाईट हाऊस जवळील परिसरात गोळीबार; गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले!

Donald Trump : व्हाईट हाऊस जवळील परिसरात गोळीबार; गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले!

Donald Trump : अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमधील ‘व्हाईट हाऊस’जवळ तैनात असलेल्या नॅशनल गार्ड्सवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन नॅशनल गार्ड्स...

By: Team Navakal
Donald Trump
Social + WhatsApp CTA

Donald Trump : अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमधील ‘व्हाईट हाऊस’जवळ तैनात असलेल्या नॅशनल गार्ड्सवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन नॅशनल गार्ड्स गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी या घटनेतील हल्लेखोराचा उल्लेख ‘प्राणी’ असा केला असून त्याला मोठी किंमत मोजावी लागेल, अशी थेट धमकी देखील त्यांनी दिली आहे.

या गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. “एका प्राण्याने आपल्या दोन नॅशनल गार्डवर गोळीबार केला आहे. या घटनेत दोन्ही गार्ड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. शिवाय, हल्लेखोरही जखमी असून त्याला मोठी किंमत मोजावी लागणार आहे असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. आपले दोन्ही गार्ड लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. हे खरोखरच महान लोक आहेत. मी, युनायटेड स्टेट्सचा अध्यक्ष म्हणून आणि प्रेसिडेंसी कार्यालयाशी संबंधित प्रत्येकजण तुमच्यासोबत उभा असेल.”

या चकमकीत हल्लेखोरही जखमी झाला असून त्यालाही रुग्णालयात नेण्यात आले. संशयिताची ओळख पटली असून त्याचे नाव रहमानउल्लाह लकनवाल आहे, जो २०२१ मध्ये अमेरिकेत घुसला होता, अशी माहिती आहे.


हे देखील वाचा – खेड्यापाड्यातील रस्त्यांसाठी उत्तम! 63 kmpl मायलेज आणि किंमतही कमी; पाहा Honda SP125 बाईकचे वैशिष्ट्ये

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या