Nilesh Rane vs Nitesh Rane: मालवणमध्ये (Malvan) नारायण राणे (Narayan Rane) यांचे पुत्र शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी काल रात्री स्टिंग ऑपरेशन करून भाजपा (BJP) पदाधिकारी विजय केनवडेकर (Vijay Kenwadekar) यांच्या घरातून २५ लाखांची रोकड असलेली बॅग पकडल्याने खळबळ उडाली. याचा व्हिडीओ व्हायरल (Video viral)झाला आहे. भाजपा निवडणुकीत पैशाचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला. आज ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पुढील कारवाईची माहिती घेण्यासाठी पोहोचले. आश्चर्य म्हणजे त्यानंतर काही तासातच त्यांचे बंधू भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज विजय केनवडेकर यांना पूर्ण पाठिंबा दिला . भावाने ज्यांच्या घरी धाड टाकून २५ लाख पकडले त्यांच्याच नितेश राणे गेले . केनवडेकर असे काही करणार नाहीत असेही म्हटले . यामुळे नारायण राणे यांच्या घरात दोन्ही भावात पडलेली फूट आता उघड झाली आहे की हे केवळ निवडणुकीपुरते नाटक आहे याची चर्चा रंगली आहे.
निलेश राणे यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर गंभीर आरोप केला आहे की, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मालवणला दोन दिवसांपूर्वी भेट दिल्यांनतर भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरातून पैशाची बॅग सापडली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्याच्या घरी २५ लाख रुपयांची रोकड सापडली आहे. त्याच्या घरी आणखीही रोकड असेल परंतु आम्ही त्याचे घर तपासू शकत नाही. काल आयोगानेही घर तपासले नाही. अजूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही . इतरही घरात वाटण्यासाठी रोकड असेल , आयोगाने शोध घ्यायला हवा . त्यांच्या घरी हे पैसे कसे आले, हे सगळे निवडणूक यंत्रणेला सांगावे लागेल. म्हणून मी आज या कार्यलयात आलो आहे. पुढे काय कारवाई केली जाते याची माहिती घेतली आहे. रवींद्र चव्हाण ज्या वेळी जिल्ह्यात येतात, तेव्हा वेगळे वातावरण तयार करतात. काल ते मालवणमध्ये सहज आले नव्हते. त्यांच्यावर माझा संशय होता. मालवणमध्ये सहा-सात घरे आहेत तिथे रोज पैशांच्या बॅग येतात. भाजपचे कार्यकर्ते तिथून येऊन पैसे घेऊन जातात. पैसे वाटून निवडून आल्यानंतर ते नगरसेवक म्हणून काम करणार का? ते वसुलीच्या कामाला लागतील. बाहेरुन आलेल्या लोकांनी ही संस्कृती इथे आणली आहे. रवींद्र चव्हाण येतात, गडबड करतात, त्यांना जिरवाजिरवी करायची असते. रवींद्र चव्हाण यांनी विकासाचा अजेंडा कुठे दाखवला? आता २४ तास यांच्यावर लक्ष ठेवावे लागणार आहे. आम्ही पकडले तर जागच्या जागी बंदोबस्त करू. पैसे वाटून नगरसेवक झाले, तर ते भ्रष्टाचार करणार आहेत. पैसे वाटप करुन निवडणूक लढवायची पद्धत आहे का? मैदानात येऊन लढा.
ज्यांच्या घरात ही रक्कम सापडली ते विजय केनवडेकर म्हणाले की, ही रक्कम माझ्या व्यवसायाशी संबंधित आहे. मी बांधकाम व्यावसायिक आहे. माझ्या घरात कोणतीही अनधिकृत रक्कम नाही. विरोधी आमदार यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यानंतर नितेश राणे म्हणाले की आमच्या पक्षाची कोणी बदनामी करू नये. आयोग चौकशी करील . प्रत्येकाचे व्यवसाय आहेत. जो नियम आम्हाला लागतो तो नियम सगळ्यांना लागणार आहे. आता सर्वच गोष्टींची चौकशी होईल. हमाम मैं सब नंगे है ।आम्ही विकासाबरोबर आहोत. आम्हाला पैसे वाटायची गरज नाही . फडणवीस आणि मोदी यांनी आणलेल्या योजनांची लाभार्थी प्रत्येक घरात आहेत.
आ. निलेश राणे यांच्या आरोपांनंतर आ. नितेश राणे शिंदे गटावर टीका करताना म्हणाले की, भाजपाला अशा पद्धतीने निवडणुका लढवण्याची गरज नाही.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, या निवडणुकीत गेले पाच-सहा दिवस विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. कालच मी मालवणमध्ये जाऊन आलो. तिथे आमचे नेते नारायण राणे, नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली केलेले काम उत्तम आहे. त्याठिकाणी आम्हाला भरभरून मतदान होणार आहे. भाजपाने युती का केली नाही, यातून या सगळ्याला सुरुवात झाली. पण कोणत्याही कार्यकर्त्याला व्यावसायिक म्हणून काम करण्याचा अधिकार नाही का? फक्त नेत्यांनाच व्यवसाय करण्याचा अधिकार आहे का? ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून आणले, त्या कार्यकर्त्यांच्या घरी अशा पद्धतीने शूटिंग करणे चांगले नाही.
उद्धव ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते विजय केनवडेकर हे लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचे मालवण शहरातील प्रचारप्रमुख होते आणि विधानसभेसाठी त्यांनी काम केले आहे. त्यांच्यामार्फत पैशाचे वाटप झाले होते हे नीलेश राणे यांना माहीत होते. याआधी पैशाचे वाटप करणारे एकत्र होते. आता दोघांमधील वादामुळे हे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे विकासाचे काम करणाऱ्या उमेदवारलाच मत द्यावे.
हे देखील वाचा-
बोरिवलीत भाजपा-ठाकरे गटात हाणामारी
पालिकेच्या सहाय्यक आयुक्तावर मारहाण व खंडणीचे गंभीर आरोप- मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार









