Ajit pawar- प्रत्येकाचा एक काळ असतो आणि प्रत्येकाचा फुगा हा फुटत असतो. मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढले जाते,” अशा कठोर शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी भाजपा नेते राजन पाटील यांच्यावर हल्ला चढवला. सोलापूरच्या वडाळा येथील एका सभेत ते बोलत होते.
अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाच्या राजन पाटील यांचे पॅनेल बिनविरोध आले होते. त्यानंतर पाटील यांचे सुपुत्र बाळराजे यांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत डिवचले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्जवला थिटे यांचा अर्जही बाद झाल्याने अनगरची निवडणूक वादात सापडली. याबद्दलच अजित पवारांनी आज पहिल्यांदाच भाष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले, दमदाटी सुरू आहे, असे तुम्ही सर्वजण म्हणत आहात, पण ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असतात. कोणी अरे केले तर कारे करणारेही लोक असतात. उज्वला थिटे यांच्याबाबत जे घडले, ते आपण पाहिले. आपल्या देशात लोकशाही आहे, संविधान आणि कायदा सर्वांसाठी समान आहे. दमदाटी करून चालत नाही. यावेळी त्यांनी उज्वला थिटे यांचा उल्लेख ‘लाडकी बहीण’ असा केला आणि भाऊ म्हणून आम्ही कायम आमच्या बहिणीचं संरक्षण करण्याचे काम केले, असे सांगितले.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा-
पालिकेच्या सहाय्यक आयुक्तावर मारहाण व खंडणीचे गंभीर आरोप- मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार









