Home / क्रीडा / Deepti Sharma: दीप्ती शर्मावर 3.30 कोटींची बोली! विश्वचषकानंतर लिलावात पैशांचा पाऊस

Deepti Sharma: दीप्ती शर्मावर 3.30 कोटींची बोली! विश्वचषकानंतर लिलावात पैशांचा पाऊस

Deepti Sharma- वुमन्स प्रीमियर लीग म्हणजे महिलांच्या आयपीएल स्पर्धेसाठी आज लिलाव पार पडला. या लिलावात महिला क्रिकेटचा विश्वचषक जिंकणार्‍या...

By: Team Navakal
Deepti Sharma
Social + WhatsApp CTA

 Deepti Sharma- वुमन्स प्रीमियर लीग म्हणजे महिलांच्या आयपीएल स्पर्धेसाठी आज लिलाव पार पडला. या लिलावात महिला क्रिकेटचा विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस पडला. या लिलावात दीप्ती शर्मा (Deepti Sharma) सर्वांत महागडी खेळाडू ठरली. तिला यूपी वॉरियर्सने तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांत खरेदी केले. तर न्युझीलंडच्या अमेलिया केरसाठी मुंबई इंडियन्सने 3 कोटी रुपये मोजले. भारताची वेगवान गोलंदाज शिखा पांडेला 2.40 कोटींची बोली लावून युपी वॉरियर्सने आपल्या संघात घेतले. याशिवाय इतर काही भारतीय क्रिकेटपटूंनाही 50 लाखांहून अधिक किमतीच्या बोली लागल्या.


महिलांच्या आयपीएलचे तीन हंगाम झाल्याने आता सर्व संघांचा चेहरा बदलणार आहे. आज एकूण 277 खेळाडू या लिलावाच्या रिंगणात होत्या. त्यामध्ये 194 भारतीय, तर 83 विदेशी खेळाडू होत्या. त्यापैकी 73 खेळाडूंवरच बोली लावण्यात येणार होती. त्यात 23 खेळाडू विदेशी होत्या. या लिलावापूर्वी सर्व संघांनी प्रत्येकी 4-5 खेळाडू कायम राखले आहेत.


विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेली भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मावर मोठी बोली लागेल अशी अपेक्षा होती.
तिची मूळ किंमत (बेस प्राईज)  50 लाख रुपये होती. दीप्तीला दिल्ली कॅपिटल्सने तिला तिच्या मूळ किमतीवर घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, यानंतर यूपी वॉरियर्सने ‘राईट टू मॅच’ कार्डचा वापर केला. दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्ससमोर दीप्तीला घेण्यासाठी 3.2 कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवला आणि यूपी वॉरियर्सने दिल्लीचा हा प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर यूपी वॉरियर्सने दीप्तीला 3.2 कोटी रुपयांना विकत घेतले. गेल्या लिलावात तिच्यावर 2.6 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लागली होती.

यूपी वॉरियर्स संघानेच हरलिन देओलला पन्नास लाख रुपयांची बोली लावून खरेदी केले. महिला विश्वचषकात विजयात महत्त्वाचे योगदान देणारी श्री चरणी हिला तिचा मूळ संघ दिल्ली कॅपिटल्सने 1.30 लाख रुपयांत खरेदी केले. तिची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. महिला विश्वचषक संघातील आणखी एक फिरकीपटू मुंबईची राधा यादवला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने 65 लाख रुपयांत विकत घेतले. भारतीय संघातील रेणुका सिंगला सर्वाधिक 60 लाख रुपयांची बोली लावून गुजरात जायंट्सने विकत घेतले. क्रांती गौडाला यूपी वॉरियर्सने 50 लाख मोजून आपल्या संघात सहभागी करून घेतले. महाराष्ट्राची स्टार खेळाडू किरण नवगिरेसाठी यूपी वॉरियर्सने 60 लाखांची बोली लावली. तिची मूळ किंमत 40 लाख रुपये होती. आशा सोभनाला वॉरियर्सने 1.10 कोटी रुपयांना,  तर मुंबई इंडियन्सने शबनम इस्माईलला 60 लाख रुपयांना विकत घेतले.  


विदेशी खेळाडूंमध्ये न्यूझीलंडची स्टार अष्टपैलू खेळाडू अमेलिया केरने सर्वाधिक किंमत मिळवली. यूपी वॉरियर्सने तिच्यावर सर्वप्रथम बोली लावली. मग मुंबई इंडियन्स संघानेही तिच्यावर बोली लावली. या दोन्ही संघांच्या बोलीच्या शर्यतीचा केरला प्रचंड फायदा झाला आणि केरची बोली 50 लाखांवरून 3 कोटी रुपयांपर्यंत वाढली. अखेरीस मुंबईने अमेलियाला 3 कोटी रुपयांत आपल्या संघात सहभागी केले. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मेग लॅनिंगचे नाव लिलावात येताच तिच्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्समध्ये चढाओढ सुरू केली. त्यानंतर अखेर तिच्यावर 1.9 कोटी रुपयांची बोली लावत यूपी वॉरियर्सने आपल्या संघात घेतले. दक्षिण आफ्रिकेची फलंदाज लॉरा वोलवार्ट हिची आधारभूत किंमत 30 लाख रुपये होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तिच्यासाठी बोलीची सुरुवात करताच दिल्ली कॅपिटल्सनेही बोली लावली. अखेरीस दिल्ली कॅपिटल्सने 1.10 कोटी रुपयांमध्ये लॉराला विकत घेतले.

50 लाख मूळ किंमत असलेली न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू सोफी डिव्हाईनला संघात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंटस संघांत चुरस पाहायला मिळाली. त्यात दिल्ली कॅपिटल्सनेही या शर्यतीत उडी मारली. अखेरीस गुजरातने तिला 2 कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले. इंग्लंडच्या संघाची खेळाडू सोफी एक्लेस्टोनला लिलावात यूपी वॉरियर्सने 85 लाख रुपयांची बोली लावून आपल्या संघात कायम ठेवले. तिची मूळ किंमत 50 लाख होती. दिल्लीने वेस्ट इंडिजच्या शेनेल हेन्रीला 1.30 कोटी रुपयांना खरेदी केले. तर ऑस्ट्रेलियन सलामीवीर फोबी लिचफिल्डसाठी यूपी वॉरियर्सने 1.20 कोटी मोजले. महिला  क्रिकेटमधील सर्वात चर्चित खेळाडू आणि यूपी वॉरियर्सची कर्णधार असलेली ऑस्ट्रेलियाची एलिसा हिलीवर कोणत्याच संघाने बोली लावली नाही. तिची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.

—————————————————————————————————————————————————–

हे देखील वाचा-

:फुगा फुटतोच ! अजित पवारांचा राजन पाटलांवर हल्लाबोल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण ! मुंबई-आग्रा महामार्गवर आंदोलन

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या