Sanjay Raut : निवडणुकीच्या पार्शवभूमीवर बरेच बदल होताना दिसत आहेत. अशातच संजय राऊत देखील आजारी होते त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतृत्व कोण करणार हा देखील एक मोठा प्रश्न होता. प्रकृती अस्वस्थतेमुळे काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूर राहिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात उतरणार आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी महिनाभर राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहण्याची घोषणा केली होती. मात्र अपेक्षेपेक्षा कमी कालावधीतच राऊत आता पुन्हा मैदानात उतरणार आहेत. पुढील आठवड्यात सोमवारी सकाळी १० वाजता संजय राऊत माध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. या पत्रकार परिषदेकडे मात्र राज्याचे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, महायुतीतील असंतोष, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे संभाव्य युती, मतदार यादीतील त्रुटी या सगळ्या चर्चेत असलेल्या मुद्द्यांवर राऊत नेमके काय भाष्य करतात, याची उत्सुकता वाढली आहे.









