Santosh Deshmukh Brother : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडास २९ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत असून याच पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संतोष देशमुख यांच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाले तरी या प्रकरणात अजूनही आरोप निश्चिती झालेली नाही. याबद्दल धनंजय देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, १२ डिसेंबर रोजी आरोप निश्चितीची तारीख आहे. तसेच, या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार असून त्याचा तपास लवकरात लवकर करावा आणि त्याला जेरबंद करावे. आरोपींकडून वेळकाढूपणा केला जात आहे. एकाच युक्तिवादासाठी तीनवेळा अर्ज देण्यात आला. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी.
परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यापासून जीवाला धोका असल्याबद्दल देशमुख यांनी पोलिस अधीक्षकांना पत्र दिले आहे. याबद्दल त्यांनी सांगितले की, मनोज जरांगे यांच्या घातपाताचा कट रचला जाऊ शकतो, तर आमच्यासारख्या एका साधारण कुटुंबाला धोका वाटणे साहजिक आहे. आम्हाला वेगवेगळ्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला. पण आम्ही कुठेच अडकलो नाही.
हे देखील वाचा – Sanjay Raut : संजय राऊत पुन्हा एकदा उतरणार रणांगणात…









