Suniel Shetty : मागच्या काही काळापासून महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी भाषेवरून मराठी आणि परप्रांतीयांमध्ये मोठा वाद सुरु आहे. अनेकदा तर भाषेवरुन झालेला वाद हा हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. हे प्रसंग आणि त्यातून उफाळलेले राजकारण, यावर बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी ह्याने यावर स्पष्टच प्रतिक्रिया दिली आहे. त्याने भाषासक्तीसाठी होणारी मारणार चुकीची आहे असे देखील म्हटले आहे.
अभिनेता सुनील शेट्टी हा त्याच्या बोल्ड स्वभावासाठी ओळखला जातो. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे. या मुलीखमध्ये मराठी भाषेवरील सध्याचे राजकारण आणि त्यातून होणारा हिंसाचार याबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्याने स्पष्ट उत्तर दिले आहे. “मराठी भाषेवरून राजकारण करणे आणि सक्तीने बोलायला लावण्यासाठी हिंसाचार करणे हे अर्थातच पूर्णपणे चुकीचे असलयाचे देखील तो बोलतो. गरीब माणसाला मारहाण करून काही साध्य होणार नाही” असे देखील सुनील शेट्टी म्हणाला.
सुनील शेट्टी पुढे सांगतो, “मी स्वतः मुंबईकर आहे. या शहराने मला बरच काही दिलं. म्हणूनच मी मनापासून सांगतो, मुंबईत राहायचं असेल तर मराठी बोलणं आणि शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. जिथे आपण राहतो तिथल्या भाषेत बोललो की त्या ठिकाणच्या लोकांचे आपल्यावरच प्रेम आणि आदर दहापटीने वाढतो. मी घरी माझ्या स्टाफशी नेहमी मराठी मधूनच बोलतो. पण हेही तितकंच खरं की, भाषा शिकवण्यासाठी किंवा बोलायला लावण्यासाठी कुणावरही सक्ती होता कामा नये. आपल्या लेकरालाही जबरदस्तीने काही शिकवता येत नाही, मग दुसऱ्याला कसे काय भाग पडायचं?”
सुनील शेट्टीच्या या विधानाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. भाषेचा आदर आणि प्रेम यांचा संदेश देताना हिंसाचार आणि सक्तीला ठाम नकार देण्याच्या त्याच्या या बोल्ड आनंदाचे सगळेच कौतुक करत आहेत.









