Cyclone Ditwah : या वर्षाचा पाऊस हा धडकी भरवणाराच म्हणावं लागेल. यावर्षी अवेळी येणाऱ्या पावसामुळे सगळ्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या पाऊस भारतीय उपखंडात आणि दक्षिण भारतात चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे आणि त्याचबरोबर त्याच्या साथीने येणारी चक्रीवादळे, जमिनीचे खच्चीकरण आणि धूप थांबणे आणि हिमस्खलन असले सगळे प्रकार नित्याने घडताना दिसत आहेत.
आणि यात भर म्हणून कि काय ‘दितवाह’ हे नवीन चक्रीवादळ येऊ घातले आहे आणि दक्षिण भारतात म्हणजे तामिळनाडू आणि पुद्दुचेरी आदी राज्यांत या वादळाचे भयंकर असे परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे या भागात तुफानी पाऊस जीवित हानी वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झाली. पण या ‘दिटवाह’ वादळाचा फटका केवळ तामिळनाडूलाच नव्हे तर इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि श्रीलंका या देशांना देखील या वादळाचे परिणाम भोगावे लागले आहेत. आणि श्रीलंकेत तर कित्येकजण या वादळामुळे बेपत्ता झाले आहेत. उष्ण कटिबंधीय प्रदेशात देखील या वादळांमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आणि इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आणि श्रीलंकेत यामुळे अक्षरशः हाहाकार माजला आहे.
‘दिटवाह’मुळे प्रचंड पाऊस, पूर आणि भूस्खलन अशी सगळे संकटे एकत्र आली आहेत, तसेच या सगळ्याचे मुख्य कारण बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आहे. वातावरणीय अनुकूल परिस्थितीमुळे या वादळाला तीव्र चक्रीवादळाचे रूप आले आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर चक्रीवादळाला मुख्य कारण झाले ते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि त्यासाठी कारण होते ते समुद्राच्या पृष्ठभागावरील उष्णता आणि वातावरणातील दमटपणा. पण या सगळ्या भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागले ते श्रीलंकेला हे वादळ श्रीलंकेच्या किनाऱ्यावर आदळले आणि तेथे मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली आणि त्या गरीब राष्ट्राला यासगळ्याचे दुष्परिणाम भोगावे लागले. या सगळ्यावरून या घटनेचे गांभीर्य लक्षात येते.
श्रीलंकेतील चक्रीवादळामुळे हाहाकार माजला असून भारतालाही या सगळ्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात कि काय अशी भीती आता वर्तवली जात आहे. संपूर्ण श्रीलंका आणि तामिळनाडूत या वादळाने हाहाकार माजवला आहे. लंकेबरोबरच भारतावर ही या वादळाची सावली पडली आहे. श्रीलंकेत झालेला पावसाचा प्रलय भारताकडे सरकताना दिसत आहे आणि पुढील १२ तासांत ते आणखी सक्षम होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. याचा अर्थ भारताला आता चक्रीवादळाच्या संकटाला सामारे जावे लागणार असे दिसत आहे.
भारतात आता वादळांची पूर्वसूचना देण्यात आली होती त्यामुळे लोकांना त्या प्रदेशात जाऊ नका असा सल्ला देखील देण्यात आला आहे, तसेच मच्छीमारांना बदलत्या हवामानामूळे सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये काही प्रमाणात सुखद बातमी म्हणजे महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा फारसा परिणाम होणार नाही. केवळ गडचिरोली जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. श्रीलंकेला भारताने या कठीण काळात मदत पाठवली आहे.
हे देखील वाचा –
दमदार इंजिन, 60 kmpl मायलेज आणि ABS! बाजारामध्ये खूपच लोकप्रिय आहे Honda ची ‘ही’ बाईक; पाहा किंमत









