Election 2025 Postponed : राज्यातील जवळजवळ २२ नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका (Nagarparishad Election 2025) पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे ह्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. मागच्या २ आठवड्यापासून जिथे प्रचाराची धामधूम होती आज तिथेच अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर मात्र चांगलाच पाणी फेरल आहे. ज्या ज्या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलली तिथं आता २० डिसेंबरला मतदान होईल आणि २१ तारखेलाच मतमोजणी होणार असल्याची माहिती आहे. उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे २ डिसेंबरलाच नियोजित वेळत होणार आहेत.
मागच्या काही काळापासून सुरू असलेला नगरपलिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. त्यामुळे आज रात्री १० वाजता प्रचाराच्या तोफानां ब्रेक लागणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबरच सर्वच बड्या नेत्यांच्या आज प्रचाराच्या शेवटच्या सभा पार पडणार आहेत.
मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमधील १७ पालिकांच्या कार्यक्षेत्रातील ३८ प्रभागांची निवडणूक आता लांबणीवर पडली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे संबंधिक उमेदवारांनी अर्ज छाननीत मोठा आक्षेप घेतला होता. अधिकाऱ्यांचा निर्णय हा संबंधितांना मान्य नव्हता. त्यामुळे उमेदवारांनी याप्रकरणी कार्टात धाव घेतली होती. न्यायालयात या हरकतींचा निकाल २३ नोव्हेंबरनंतर लागला. तो पर्यंत अर्ज माघारीची मुदत निधून गेली होती. तसेच पर्यायाने चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेला देखील विलंब झाला. त्यामुळे संबंधितांना प्रचाराल फार कमी वेळ मिळाला. म्हणून राज्य निवडणुका पुढे ढकलण्याचे निर्देश देण्यात आले.
कुठे – कुठे होणार दुसऱ्या टप्प्यात निवडणूक? (Nagarpalika Nagarpanchayat Election 2025 Postponed)
चंद्रपूरमधील घुग्गुस, वर्धामधील देवळी, पुणे जिल्ह्यातील बारामती, अहिल्यानगरमधील कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी.लातूर जिल्ह्यातील रेणापूर, सोलापूरमधील मंगळवेढा, अनगर, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, फलटण, यवतमाळ नगरपालिका, वाशिम नगरपालिका, बुलढाणामधील देऊळगावराजा, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, जिल्ह्यातील अंबरनाथ.
हे देखील वाचा – Nashik Kumbh Mela : नाशिकमध्ये तपोवनात वृक्षतोडीचा वाद अधिक चिघळणार? वाद नेमका काय जाणून घ्या..









