Crime News : जगात अनेक पवित्र नाती असतात त्यातलंच एक पती-पत्नीचं नातं. जगातील प्रत्यक नाती हि विश्वासाच्या आधारावर टिकून असतात. मात्र याच विश्वासाला तडा गेले तर आणि संशयाने या नात्यात जागा घेतली तर विपरीत घडायला वेळ लागत नाही. एका विकृत तरुणाने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिच्या मृतदेहासह त्याने अगदी विकृतपणे सेल्फी काढला आणि विश्वासघाताची किंमत मोजावी लागते असं म्हणत हा सेल्फी पोस्ट केला आहे. ही घटना कोईंबतूर इथली आहे. मृत महिलेचं नाव प्रिया असं आहे. आणि आरोपीचं नाव बालामुरुगन असं आहे. या दोघांना तीन मुलं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मृत पत्नी पतीपासून वेगळी राहात होती आणि नोकरी करत होती. आणि आरोपीला असं वाटत होतं की आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत. त्या संशयातूनच त्याने तिची निर्घृण हत्या केली. या दोघांमध्ये या गोष्टीवरुन प्रचंड वादही झाले. या दोघांमधला वाद इतका विकोपाला गेला तेव्हा आरोपीने लपवलेला कोयता बाहेर काढला आणि आपल्या पत्नीवर कोयत्याने वार केला. ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. यानंतर तिच्या मृतदेहासह त्याने सेल्फी काढत विश्वासघात केल्याची किंमत मोजावी लागते असं कॅप्शन देत फोटो पोस्ट केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत हा विकृत आरोपी त्याच्या पत्नीच्या मृतदेहाच्या शेजारीच बसून होता. पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली असून त्याची आता चौकशी सुरु आहे.
हे देखील वाचा – Bus Accident : तामिळनाडूत बसचा भीषण अपघात..









