Home / महाराष्ट्र / Nanded Crime : सक्षमच्या मृत्यूनंतर सक्षमच्या आईची सुनेसाठी भावनिक साद

Nanded Crime : सक्षमच्या मृत्यूनंतर सक्षमच्या आईची सुनेसाठी भावनिक साद

Nanded Crime : अंतरजातीय विवाहाबद्दल अजूनही समाजात कटू भावनाच आहेत. याच भावनेतून नांदेडमध्ये अंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे (Saksham Tate) या...

By: Team Navakal
Nanded Crime
Social + WhatsApp CTA

Nanded Crime : अंतरजातीय विवाहाबद्दल अजूनही समाजात कटू भावनाच आहेत. याच भावनेतून नांदेडमध्ये अंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे (Saksham Tate) या १९ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या केली. हा खून सक्षमची प्रेयसी आंचल मामीडवार (Anchal Mamidwar) हिच्या वडिलांनी आणि भावांनी केल्याचा भयंकर खुलासा झाला. या भयंकर घटनेनंतर आंचलने एक मोठं पाऊल उचललं तिने थेट सक्षमच्या पार्थिवाशी विवाह केला. याशिवाय तिच्या धाडसाचेही कौतुक करू तेवढे थोडकेच तिने स्वतःच्या वडील आणि दोन भावांविरोधात देखील पोलिसात साक्ष दिली आहे. सक्षमच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीदेखील आंचलने माध्यमांसमोर केली आहे. तर पोलिसांनी (Police) या प्रकरणात सर्व आरोपींना जवजवळ १२ तासातच अटक केली आहे. (Nanded Crime)

या प्रकारानंतर आंचल थेट सक्षमच्या घरी पोहोचली. आपल्या प्रियकराच्या पार्थिवाशी तिने लग्न केलं. “सक्षम मृत्यूनंतरही जिंकला… आणि माझे वडील हरले,” असं देखील ती म्हणाली. अंत्यविधीपूर्वी सक्षमच्या पार्थिवासमोरच त्याच्या नावाचे कुंकू कापळी लावून तिने सर्वांना स्तब्ध केले. “मी आयुष्यभर सक्षमच्या घरात त्याची पत्नी म्हणूनच राहीन,” असा ठाम निर्धार देखील तिने व्यक्त केला.

या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. सक्षमची हत्या होण्याच्या दोन तास आधीच आंचलची आई जयश्री मामीडवार सक्षमच्या घरी येऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. तिथे जाऊन तिने सक्षमला धमकी दिली आणि आमच्या मुलीपासून लांब राहा, असे सांगितले. यानंतर अवघ्या दोनच तासांनी सक्षम ताटे याची हत्या करण्यात आली.

सक्षमच्या आईची भावनिक साद
या प्रकरणावर सक्षमची आई संगीता ताटे यांनी देखील भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. त्या सांगतात ‘सक्षमच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी आंचल मला पोलीस स्टेशनमध्ये भेटली. ती प्रचंड रडत होती आणि माझ्याबरोबरच ती आमच्य्या घरी आली. माझ्या गळ्यात पडून ती खूप रडत होती आणि म्हणाली की मी तुमच्याच घरी राहीन. त्या दिवशी मी तिला माझ्या घरी घेऊन गेले. जसं मी माझ्या मुलावर प्रेम केलं, अगदी तसंच प्रेम मी आंचलवरसुद्धा करीन. तिला मुलगी न मानता, सक्षमप्रमाणेच माझा मुलगा माणीन. तिच्यात मला सक्षमच रूप दिसत. मी तिच्यावर माझ्या स्वतःच्या लेकीएवढंच प्रेम करेन. जोपर्यंत माझ्या जिवंत जीव आहे, तोपर्यंत मी तिच्यावर प्रेम करत राहीन. माझी एकच मागणी आहे की, माझ्या मुलाला न्याय मिळावा,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


हे देखील वाचा – Crime News : विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पतीने पत्नीचा केला खून

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या