Tere Ishk Mein : धनुष आणि क्रिती सॅनन यांचा बहुप्रतिक्षित रोमँटिक ड्रामा, तेरे इश्क में, अखेर २८ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. दुसऱ्या दिवशीही तो आपली जादू कायम ठेवण्यात यशस्वी झाला.
तेरे इश्क मेंने शनिवारी ₹१७ कोटी कमावले. शुक्रवारी चित्रपटाने ₹१६ कोटी कमावले हे पाहता, कलेक्शनमध्ये ही थोडीशी वाढ आहे. दोन दिवसांनंतर चित्रपटाचा एकूण कलेक्शन ₹३३ कोटी झाला आहे. अशा प्रकारे, ‘तेरे इश्क में’ या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत एकूण ५१.७५ कोटी रुपयांचे तगडे असे कलेक्शन केले आहे.
‘तेरे इश्क में’ ने आता कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या कलेक्शनला देखील मागे टाकले आहे, जो २३.७५ कोटी रुपयांचा होता. ‘रांझणा’ आणि ‘अतरंगी रे’ नंतर आनंद एल राय यांच्यासोबतची धनुषची ही तिसरी कलाकृती सगळयांनाच भावली. प्रेक्षकांनी सुरुवातीच्या तीन दिवसात चित्रपटाला चांगलीच पसंती दिली आहे. या जोरावर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा तगडा असा आकडा गाठला आहे. क्रिती आणि धनुषच्या केमिस्ट्रीला देखील चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळाली आहे.
हे देखील वाचा – Terrible Storm : भयंकर वादळात एकूण १००० हून अधिक लोकांचा मृत्यू..









