Home / महाराष्ट्र / Eknath shinde : हॅलो, एमआयडीसी मंजूर करा! शिंदेंची विरोधकांकडून खिल्ली

Eknath shinde : हॅलो, एमआयडीसी मंजूर करा! शिंदेंची विरोधकांकडून खिल्ली

Eknath shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचा नवा ट्रेंड सध्या चर्चेत आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा प्रचार करत असताना भर...

By: Team Navakal
Eknath Shinde
Social + WhatsApp CTA

Eknath shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचा नवा ट्रेंड सध्या चर्चेत आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा प्रचार करत असताना भर प्रचारसभेतून ते आपल्या मंत्र्याना फोन लावतात आणि स्थानिक जनतेची समस्या सांगून काहीतरी मंजूर करून घेतात. मात्र, यावरून विरोधक (opposition) त्यांची यथेच्छ खिल्ली उडवत आहेत.

शिंदे यांनी पहिला फोन यवतमाळमधील पांढरकवडातील सभेतून उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना लावून इथे रोजगाराची समस्या असल्याचे सांगत एमआयडीसीचा (MIDC) शब्द घेतला. यानंतर त्याच दिवशी वणी इथल्या सभेतून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना फोन लावून इथे कोळशामुळे हवा आणि पाणी दूषित होते, तत्काळ कारवाई करा, असा आदेश दिला. हा पॅटर्न लोकप्रिय होतो आहे, हे लक्षात आल्यावर शिंदे यांनी संगमनेरमधील सभेत एमआयडीसीसाठी पुन्हा उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन लावला. यानंतर शेवगावमधील सभेत, पाणीपुरवठा योजनेसाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाब पाटील यांना फोन लावला. त्यानंतर उदगीर येथील सभेत शिंदे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना फोन लावून रुग्णालयात सोनोग्राफी, एमआरआय मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

शिंदे हे सर्व फोन भरसभेत लावून माईकवरून उपस्थितांना एेकवतात. त्याला सभेच्या उपस्थितांकडून जोरदार प्रतिसाद मिळतो. मात्र, विरोधक यावरून त्यांच्यावर उपरोधिक शैलीत टीका केली आहे. उबाठाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एका सभेत शिंदे यांच्या भाषणाची नक्कलच करून दाखवली. हॅलो उदयजी, मी आता कळंबमध्ये आलोय, मी एकनाथ शिंदे बोलतोय, उदयजी तुम्हीच का मंत्री? इथं लोकांची एक समस्या आहे. इथलं एक हालगाट दूध देत नाही… आता त्याचं दूध का तेवढं काढून द्या. मग मंत्र्यांनी सांगायचं, काळजी करू नका साहेब, लगेच चरवी दूध काढून दोन दिवसात पाठवतो कळंबला, कशानं हाणाव आम्हाला? काय पद्धत आहे? कायबी आलं की हॅलो..

काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) जोरदार करत म्हणाले की, जिथं जातील तिथं एमआयडीसी मंजूर करतात. लोक म्हटले की, थोडे पाणी पाहिजे, ते म्हणतात, धरण मंजूर. धरणाला नदी नाही, नदी मंजूर. नदीला पाणी नाही, डोंगर मंजूर. निवडणुकीत बनवाबनवी करायची यांना सवय झाली आहे. पण आता अशी ही बनवाबनवीचा कार्यक्रम चालणार नाही. लोकांच्या लक्षात आले आहे.

तर उबाठाच्या (UBT) सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही शिंदेंना टोला लगावत म्हटले की, आम्हाला एकनाथ शिंदे अन् उदय सामंत यांच्यासारखे फोनवर नकली बोलायची गरज नाही.


हे देखील वाचा-

लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएचे काश्मीर-लखनौत छापे

Web Title:
संबंधित बातम्या