Cheapest Bikes in India : भारतात दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी 100cc ते 110cc क्षमतेच्या मोटरसायकल्स नेहमीच पहिली पसंती ठरतात. या गाड्यांमुळे इंधनाची बचत होते आणि त्यांची देखभाल करणेही सोपे असते.
2025 मध्ये ₹55 हजार ते ₹75 हजार (एक्स-शोरूम) या बजेटमध्ये दमदार कामगिरी आणि उत्कृष्ट मायलेज देणारे 5 सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही या गाड्यांची किंमत, मायलेज आणि प्रमुख वैशिष्ट्ये याबद्दल माहिती देत आहोत.
Hero HF Deluxe
ही बाईक देशातील सर्वात स्वस्त 100cc बाईक्सपैकी एक आहे. यात 97.2cc चे एअर-कूल्ड इंजिन दिले आहे, जे 7.9 हॉर्स पॉवर निर्माण करते. हे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही बाईक सुमारे 65 किलोमीटर प्रति लीटरचे चांगले मायलेज देते, ज्यामुळे ती शहर तसेच ग्रामीण भागासाठी योग्य ठरते. इंधन वाचवण्यासाठी यात i3S स्टॉप-स्टार्ट तंत्रज्ञान समाविष्ट आहे. तिचे वजन 112 किग्रॅ असून, ट्यूबलेस टायर्स सुरक्षितता देतात. या बाईकची सुरुवातीची किंमत ₹56,250 (एक्स-शोरूम) आहे.
TVS Sport
टीव्हीएस स्पोर्ट ही बाईकदेखील भारतातील स्वस्त कम्यूटर बाईक्समध्ये गणली जाते. यात 109.7cc क्षमतेचे इंजिन आहे, जे 8.2 हॉर्स पॉवर निर्माण करते. ही बाईक सुमारे 70 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. 4-स्पीड गिअर आणि इको थ्रस्ट इंधन इंजेक्शनमुळे रायडिंग अधिक सुरळीत होते. तिचे वजन 112 किग्रॅ आहे. यासोबत डिजिटल ॲनालॉग स्पीडोमीटर आणि चार्जर यांसारखे फीचर्स मिळतात. टीव्हीएस स्पोर्टची एक्स-शोरूम किंमत ₹55,100 पासून सुरू होते.
TVS Radeon
टीव्हीएस रेडॉन ही स्टाइलिश आणि अधिक फीचर्सनी युक्त असलेली बाईक आहे. 109.7cc BS6 इंजिनमुळे यात 8.08 हॉर्स पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क (Torque) मिळतो. ही बाईक 73 किलोमीटर प्रति लीटरचे उत्कृष्ट मायलेज देते. सुरक्षिततेसाठी यात सिंगल चॅनल ब्रेकिंग प्रणाली (Single Channel Braking System) दिली आहे. याशिवाय, एलईडी हेडलाइट, डिजिटल डिस्प्ले यांसारखे फीचर्स खास आहेत. 119 किग्रॅ वजन असलेली ही बाईक 18-इंच चाकांसह येते. ही बाईक ₹55,100 (एक्स-शोरूम) किंमतीत खरेदी करता येते.
Honda Shine 100
होंडा शाइन 100 ही प्रीमियम गुणवत्ता असलेली स्वस्त बाईक आहे. यात 98.98cc इंजिन दिले असून, ते 7.38 हॉर्स पॉवर निर्माण करते. ही बाईक 55-60 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. या सेगमेंटमधील सर्वात हलकी बाईक म्हणून तिची ओळख आहे आणि ती 17-इंच चाकांसह येते. एलईडी टेललाइट, ॲनालॉग-डिजिटल मीटर आणि 5 आकर्षक रंगांचे पर्याय यात उपलब्ध आहेत. होंडा शाइन 100 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹61,603 आहे.
Hero Splendor Plus
उत्कृष्ट मायलेज आणि विश्वासार्हतेमुळे हिरो स्प्लेंडर प्लस ही देशात सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. यात 97.2cc इंजिन असून, ते 8.02 हॉर्स पॉवर निर्माण करते. ही बाईक सुमारे 80 किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज देते. सुधारित 5-स्पीड गिअरबॉक्स, i3S तंत्रज्ञान आणि 112 किग्रॅ वजन यामुळे ती डेली कम्यूटरसाठी उत्तम आहे. तिच्या XTEC प्रकारात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसारखे आधुनिक फीचर्स मिळतात. स्प्लेंडर प्लसची किंमत ₹73,764 पासून सुरू होते.
हे देखील वाचा – Sanchar Saathi App : ‘संचार साथी’ ॲप काय आहे? जे सरकार स्मार्टफोनमध्ये प्री-इंस्टॉल करण्यास सांगत आहे; जाणून घ्या








