Samsung Galaxy Z TriFold : टेक क्षेत्रातील मोठी कंपनी सॅमसंगने आपला पहिला दोनदा फोल्ड होणारा स्मार्टफोन ‘Galaxy Z TriFold’ लाँच केला आहे. हा फोन 10 इंचाच्या मोठ्या आतील डिस्प्लेमुळे आणि ट्रिपल रिअर कॅमेरा युनिटमुळे चर्चेत आहे. हा स्मार्टफोन चालू महिन्याच्या अखेरीस दक्षिण कोरियामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
या फोनमध्ये Qualcomm चा शक्तिशाली Snapdragon 8 Elite for Galaxy चिपसेट वापरला आहे. यात 16 GB रॅम आणि 1 TB पर्यंत स्टोरेज आहे.
Samsung Galaxy Z TriFold: किंमत आणि उपलब्धता
सॅमसंग गॅलेक्सी झेड ट्रायफोल्डची किंमत अद्याप कंपनीने जाहीर केलेली नाही. मात्र, कंपनीने स्पष्ट केले आहे की, हा पहिला दोनदा फोल्ड होणारा स्मार्टफोन 12 डिसेंबर रोजी दक्षिण कोरियामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. यानंतर हे नवीन फोन चीन, तैवान, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका यासह इतर जागतिक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
हा फोन फक्त एकाच क्राफ्टेड ब्लॅक रंगात उपलब्ध असेल. निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअरमध्ये हे उपकरण उपलब्ध असेल, जिथे ग्राहक ते प्रत्यक्ष अनुभवू शकतील.
मुख्य वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी झेड ट्रायफोल्ड हा ड्युअल सिम फोल्डेबल स्मार्टफोन Android 16 वर आधारित OneUI 8 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
- आतील डिस्प्ले: यात 10 इंच QXGA+ Dynamic AMOLED 2X (2,160×1,584 पिक्सेल) डिस्प्ले आहे, ज्यात 269ppi पिक्सेल घनता, 1600nits पर्यंत पीक ब्राइटनेस आणि 120Hz ॲडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट मिळतो.
- कव्हर डिस्प्ले: समोरच्या बाजूला 6.5 इंच Full-HD+ Dynamic AMOLED 2X (1,080×2,520 पिक्सेल) कव्हर डिस्प्ले आहे, ज्याला Corning Gorilla Glass Ceramic 2 चे संरक्षण देण्यात आले आहे.
- प्रोसेसर आणि स्टोरेज क्षमता: फोनला Qualcomm चा 3nm स्नॅपड्रॅगन 8 एलिट फॉर गॅलेक्सी चिपसेट शक्ती देतो, यात 16 GB रॅम आणि 1 TB पर्यंत अंतर्गत साठवण क्षमता आहे.
- बॅटरी: या फोनमध्ये 5,600mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W वायर्ड आणि 15W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
- पाणी आणि धूळ प्रतिरोध: हा फोन IP48 रेटिंगसह धूळ आणि पाण्याला प्रतिरोधक आहे.
कॅमेरा आणि डिझाईन
कॅमेऱ्यासाठी, सॅमसंग गॅलेक्सी झेड ट्रायफोल्डमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा युनिट आहे. यात 200 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा (OIS सह), 12 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 10 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा (30x पर्यंत डिजिटल झूमसह) यांचा समावेश आहे. कव्हर आणि आतील डिस्प्लेवर दोन 10 मेगापिक्सलचे सेल्फी कॅमेरे आहेत.
या फोनमध्ये टायटॅनियमचे बिजागर वापरले आहे, जे प्रगत आर्मर ॲल्युमिनियमसह जोडले आहे. यात दोन वेगवेगळ्या आकाराचे बिजागर आणि ड्युअल-रेल स्ट्रक्चर आहे. फोल्ड केल्यावर याचे माप 159.2×75.0x12.9mm आणि उघडल्यावर 159.2×214.1×3.9mm इतके आहे. फोनचे वजन सुमारे 309 ग्रॅम आहे.
हे देखील वाचा – 8th Pay Commission : 8 व्या वेतन आयोगाबाबत सरकारने दिली महत्त्वाची माहिती; मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या एकत्रीकरणावरही खुलासा









