Malvan Election : आज सकाळपासूनच निवडणुकांची रणधुमाळी जवळजवळ प्रत्यक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी देखील सध्या प्रचंड शिगेला पोहोचली असल्याचे दिसून येत आहे. या जिल्ह्यात एकूण चारही ठिकाणी ४ नगराध्यक्ष पदांसाठी १९ आणि ७७ नगरसेवक पदांसाठी ३०८ उमेदवार आपले नशीब पारखून पाहणार आहेत. मात्र, या निवडणुकीचे वैशिष्ट्य काय असेल तर एकाच जिल्ह्यात असलेल्या दोन सख्या भावांमधील असलेली आपसी रणजीश. अर्थात भाजप आणि शिंदेंची शिवसेना महायुतीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत असलेली राजकीय फूट देखील या निवडणुकीमुळे पहायला मिळत आहे.
मागच्या काही काळापासून शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि भाजप नेत्यांमधील संघर्ष वाढतच चालला आहे. या संघर्षामुळे सतत चर्चेत असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या (Malavan Nagarparishad Election) मतदानापूर्वीची रात्रही चांगलीच वादग्रस्त ठरली. मालवणध्ये काल मध्यरात्री नाकाबंदीत एक कार सापडली. या कारमध्ये तब्ब्ल दीड लाखांची रोकड सापडली आहे. ही कार भाजप (BJP) स्थानिक पदाधिकाऱ्याची असलयाचे थेट आरोप आता शिंदेंच्या शिवसेनेतील काही कार्यकर्त्यांनी आणि निलेश राणे यांच्याकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे काल मध्यरात्री पासूनच वातावरण प्रचंड तापले असलयाचे दिसून येत आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मालवणमध्ये मध्यरात्री नाकाबंदीत मालवण पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या गाडीत रोख रक्कम पकडली आहे. काल रात्रुं १० वाजता प्रचार संपल्यानंतर मध्यरात्री पोलिसांच्या नाकाबंदी वेळी देवगड भाजपा तालुका अध्यक्ष महेश नारकार यांच्या MH-07- AS-6960 या कार मध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोख रोकड आढळून आली. मालवण पोलिसांनी सदर वाहन अधिक तपासासाठी मालवण पोलीस स्थानकात आणले असता मालवण येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि त्याचसोबत अजिंक्य पाताडे यांनी नंबर प्लेट नसलेली चार चाकी गाडी घेऊन पोलीस ठाण्यात येऊन झालेलं प्रकरण मिटवण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र या सगळ्याप्रकारानंतर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी मात्र आक्रमक पवित्र हाती घेतला. त्यांनी मालवण पोलीस ठाण्यात दाखल होत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातुन मागे हटणार नाही,पवित्रा हाती घेतला.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भावाभावांमध्येच मोठी चुरस पाहायला मिळत आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजप विरोधात शिंदेंची शिवसेना, त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेससोबतच सर्व पक्षांनी एकत्र येऊन ‘शहर विकास आघाडी’ निर्माण केली आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष उमेदवार समीर नलावडे ( भाजप) ,संदेश पारकर (शहर विकास आघाडी ), गणेशप्रसाद पारकर (लोकशक्ती ), सौरभ पारकर ( अपक्ष ) तर नगरसेवक १७ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. कणकवलीतील या एकत्र उभ्या राहिलेल्या विरोधी आघाडीमुळे ही निवडणूक पालकमंत्री नितेश राणे यांच्यासाठी नाकीनव आणणारी ठरेल का हे लवकरच स्पष्ट होईल.
हे देखील वाचा –









